Download App

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले? गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Girish Mahajan On Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनावरही निशाणा साधला. ते म्हणाले. सामना पेपर आता फक्त पुसायच्या कामापुरता राहिला आहे. कोण वाचतं सामना पेपर? सामनाला आपण का एवढं महत्व देतो? लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाने एक उमेदवार निवडून आणून दाखवावा, असं खुलं आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे. रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरुन आज गिरीश महाजन यांनी ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं. अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी काय बोंब पाडली, काय दिवे लावले? असा खोचक सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.

Maratha Reservation : माझा उपचार कोणता? मनोज जरांगे पाटलांनी दिलं उत्तर…

मंत्री महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांनी ते बोलावं. पण त्यांचं कोण ऐकतं का? मोदींना संपूर्ण जगानं डोक्यावर उचलून घेतलं आहे. आपण सर्वांनी जी-20 परिषदेमध्ये पाहिलं असेल.

आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध

देशामध्ये काय चाललं आहे? सगळी जनता त्यांच्या पाठिशी उभी आहे. आणि उद्धव ठाकरे काय काय तोंडसुख घेत आहेत. असं तोंडसुख घेतल्याने त्यांचा पक्ष वाढणार नाही. त्यांनी विधायक बोलावं, त्यांनी चांगलं बोलावं त्यातूनच त्यांचं अस्तित्व टिकेल, असेही यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

त्याचवेळी मराठा आरक्षणाबद्दल मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे की, जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनावर काहीतरी तोडगा निघावा. माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं. त्यांनी आता पाणी देखील सोडले आहे. त्यांची तब्येत खराब होत आहे.

त्यांचे शिष्टमंडळ आले होते, त्यांच्यासोबत चर्चा झाली पण त्यांची मागणी आहे की, तात्काळ जीआर काढावा पण तसे झाले तर ते आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्री महाजन म्हणाले की, सरसकट आरक्षण हे तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण न सोडल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. त्यामुळे मराठा आरक्षणावर कायमस्वरुपीचा तोडगा काढण्यासाठी शासनाला काही वेळ द्यावा अशी मागणी देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

Tags

follow us