Download App

गिरीश महाजनांनी तर संजय राऊतांची इज्जतच काढली, म्हणाले…

जळगाव : एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असं समजण्याचं कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे, हे सर्वांना माहित आहे. सर्वांना त्यांची कीव येते. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, संजय राऊत (Sanjay Raut) हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पध्दतीनं शिवराळ भाषा वापरत आहेत. राऊत हे वाचाळवीर आहेत. त्यामुळे ते तोंडात येईल तसं बडबड करतात. त्यांच्याकडं कुणी लक्ष देत नसल्याची टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलीय.

यावेळी महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. एकीकडं विधानसभेत अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडायची, मोठमोठ्यानं भाषणं करायची आणि दुसरीकडं त्यांच्या मतदारसंघात पोलिसांनी छापा टाकला की माझी माणसं आहेत म्हणून पोलिसांना फोन करायचा अन् पोलिसांना धमकायचं. त्यामुळं खडसे साहेबांचं सर्व पितळ उघडं पडतंय अशी टीका केलीय.

लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हाकलं, महाजनांचा हल्लाबोल

एकनाथ खडसे यांच्या अनेक चौकशा सुरु आहेत. नेमकी कोणती चौकशी सुरु आहे, हे माहीत नाही. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार ती चौकशी सुरु असल्याचं मंत्री महाजन यांनी म्हटलंय.

मंत्री गिरीश महाजनांनी कापसाच्या दरावरुन आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. ते म्हणाले की, कापसाला एकीकडं 12 हजार रूपये भाव होता. मात्र सध्या जो भाव कापसाला आहे ते खते आणि रासायनिक औषधांच्या तुलनेत खूप कमी आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या गठाणींना भाव कमी झाल्यामुळं हा भाव थोडा तुटलेला आहे. पण सरकार निश्चित याबाबत सकात्मक विचार करत असल्याचं यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितलं.

याच अधिवेशनात याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सर्व किंमतीची भाव वाढ अवलंबून असते. त्यामुळंच गॅस सिलेंडर असेल किंवा इतर वस्तुंच्या दराक वाढ झाल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय.

Tags

follow us