किरीट सोमय्यांनी घोटाळा झाल्याचं केलं मान्य, म्हणाले हो…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी पत्रकारांनी किरीट सोमय्यांना त्यांच्या कार्यालयात घडलेल्या घोटाळ्याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. यावेळी ते म्हणाले की, मला दुःख वाटतंय सकाळपासून घोटाळा घोटाळा, किरीट सोमय्याचा घोटाळा मी जरा पत्रकारांना विनंती करतो की सेंसेशनालायझेशन करा. पण युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्या दोन कर्मचाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, त्याला एवढं रंगवून देण्याची… त्याची युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टींनी तक्रार केली. हो दोन कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केला, त्याची आठवडाभर पोलीस चौकशी करत होती. आता त्याची अधिकृत एफआयआर दाखल होऊन पुढची चौकशी सुरु असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्यांनी सांगितलंय.
Sandeep Deshpande : सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा नेता जाणून घ्या संदीप देशपांडेंचा राजकीय प्रवास
सोमय्या म्हणाले की, युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गैरव्यवहार झाला त्यावर त्याचे ट्रस्टींनी तक्रार केली त्याची पोलीस चौकशी करत आहेत. ज्येष्ठांसाठी अत्यंत सुदर उपक्रम सुरु आहे आणि तो पुढेही चालूच राहणार असल्याचंही यावेळी सोमय्यांनी सांगितलं.
*नेमकं प्रकरण काय?*
प्रफुल्ल कदम हे सोमय्या यांच्या कार्यालयाचे गेल्या पाच वर्षांपासून काम पाहतात. सोमय्या हे युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केलं होतं. ट्रस्टकडून दिव्यांग, एचआयव्हीग्रस्तांसाठी काम केलं जातं. त्यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेची मदत घेतली जाते. या ट्रस्टमध्येच श्रवण यंत्रांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.
युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट 2017-2018 पासून ‘ऐका स्वाभिमानाने’ हा उपक्रम राबवतं. यात ज्येष्ठ नागरिकांना फक्त पाचशे रुपयांत श्रवणयंत्र दिलं जातं. या श्रवणयंत्र वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. ट्रस्टतर्फे आयोजित शिबिरातून श्रवण यंत्रांचं वाटप होतं. पण प्रकल्प प्रमुख प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित यांनी हा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय.
ट्रस्टनं काही दिवसांपूर्वी प्रज्ञा गायकवाड यांना श्रवण यंत्राचा हिशोब विचारला. तेव्हा त्यांनी सर्व यंत्रांचं वाटप झाल्याचं सांगितलं. मात्र, याची तपासणी केली असता 1472 यंत्रे आणि 7 लाख 36 रुपयांची तफावत आढळली. त्याबद्दल अधिक चौकशी केल्यानंतर प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांनी गैरव्यवहाराची कबुली दिली. त्यानंतर तक्रार दाखल केली. हा गैरव्यवहार कधीपासून सुरू होता, हे तपासात समोर येणारंय.