Download App

गिरीश महाजन दरवेळेस नाथाभाऊंची ‘ती’ दुखरी नस दाबतात ?

Girish Mahajan VS Eknath Khadse: खडसेंमुळे बॅकफूटवर गेल्यावर गिरीश महाजन दरवेळेस एक हुकमाचा पत्ता टाकतात. त्यातून खडसेंची दुखरी नस पकडतात.

  • Written By: Last Updated:

Girish Mahajan VS Eknath Khadse: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) या दोघांमध्ये विस्तव जात नाही. हे उभा महाराष्ट्र कायमच बघत आलाय. त्यातून दोघेही एकमेंकांवर वार करायची कुठलीच संधी सोडत नाही. जळगावातील जामनेरमधील प्रफुल्ल लोढा याला हनी ट्रॅप, बलात्काराचा गुन्ह्यात अटक झालीय. लोढा हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा जवळचा. त्यामुळे मंत्री महाजनांना कोंडीत पकडण्याची आयती संधी एकनाथ खडसेंना मिळाली. त्यांनी गिरीश महाजनांना घेरले. तसं खडसेंमुळे बॅकफूटवर गेल्यावर गिरीश महाजन दरवेळेस एक हुकमाचा पत्ता टाकतात. त्यातून खडसेंची दुखरी नस पकडतात. ही दुखरी नस कोणती हेच पाहुया…

…तेव्हा राऊत कुठेतरी फुकत बसले असतील; आमदार निलेश राणेंची जळजळीत टीका

ही दुखरी नस दुसरी तिसरे काही नसून, निखिल खडसे यांच्या मृत्यूची आहे. हा विषय आल्यानंतर एकनाथ खडसे हे प्रचंड दु:खी होतात. निखिल हे नाथाभाऊ म्हणजे एकनाथ खडसे यांचा एकुलता एक मुलगा होता. तेही राजकारणात आलेले. जळगाव जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेले. पण 2009 मध्ये विधानपरिषदेत निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांच्याकडून निखिल खडसे हे पराभूत होतात. हा खडसे कुटुंबाला सर्वात मोठा झटका असतो. त्यानंतरही निखिल खडसे हे भाजपचे पदाधिकारी म्हणून राजकारणात सक्रीय होते. परंतु 1 मे 2013 रोजी निखिल खडसे हे मुक्ताईनगर येथील बंगल्यात स्वतःजवळील रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या करतात. त्यावेळी घरात त्यांची आई मंदाताई, पत्नी रक्षा खडसेही असतात. त्यावेळी एकनाथ खडसे हे जळगावला कार्यकर्त्याच्या लग्नाला गेलेले होते. निखिल खडसे यांनी डोक्यात गोळी मारून घेतल्याने त्यांचा मृत्यू झालेला असतो. मृत्यूपूर्वी कुठलीही सुसाइ़ड नोट त्यांनी ठेवलेली नसते.


आत्महत्यामागे वेगवेगळे कारणे

निखिल खडसे यांच्या आत्महत्येची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. त्यात एक राजकारणात आलेले अपयश आणि दुसरे मान व पाठ दुखीने त्रस्त असल्याने त्यांनी जीवन संपविल्याचे बोलले जाते. निखिल खडसे यांचा मृत्यू होऊन एक तप उलटलंय. पण खडसे आणि महाजन यांच्या राजकीय वादात निखिल खडसेंचे नाव येते.

जेव्हा खडसे हे वरचढ ठरायला लागतात. तेव्हा महाजन हे थेट निखिल खडसे यांचा विषय काढून नाथाभाऊंना घेरतात. हनीट्रॅप प्रकरणात एकच मंत्री का बोलत आहेत ? त्यांचा काय संबंध आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करायला हवी, अशी मागणी खडसे यांनी केली. त्यावरून मंत्री गिरीश महाजन प्रचंड संतापले. त्यांनी प्रफुल्ल लोढा आणि खडसे यांच्याबरोबर फोटो फेसबुकवर टाकले. प्रफुल्ल ओझा हा सर्वपक्षीय नेता आहे. चौकशी करायचीच असेल तर मग निखिल खडसे मृत्यू प्रकरणाची ही चौकशी करायची का? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केलाय. त्यावर खडसेंनी प्रत्युत्तर दिले. तू मोठा नेता आहेस तर थेट सीबीआय चौकशी कर, असे खडसे म्हणाले. माझा एकुलता एक मुलगा गेला. महाजनला मुलगा नाही. त्याला माझे दुखः काय कळणार असे म्हणत खडसे हे भावूक झाले. दोघांचे राजकीय वाद, वैर असले तरी दोघांनी आपल्या घरातील मुलांबाळांचा विषय काढून राजकीय पोळी भाजवू नये, असे आम्हाला वाटते.

follow us