Girish Mahajan : खडसेंच्या घरातली एक गोष्ट सांगितली तर लोकं जोड्याने मारतील, महाजनांचा पलटवार

Girish Mahajan :  खडसेंच्या घरातली एक गोष्ट सांगितली तर लोकं जोड्याने मारतील, महाजनांचा पलटवार

Girish Mahajan : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात मागील अनेक वर्षांपासून कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. अशातच आता पुन्हा एकदा खडसेंनी महाजनांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपावर मंत्री गिरीश महाजनांनीही पलटवार केलायं. एकनाथ खडसेंच्या घरातली गोष्ट सांगितली तर लोकं त्यांना जोड्याने मारतील, असं मोठं विधान महाजनांनी केलंय.

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयच दोषी; सरकारी समितीचा अहवाल शासनाला सादर

पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे एक नंबरचे चोर असून कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काहीही जमत नाही. माझ्यावरील आरोपांचा त्यांनी एक तरी पुरावा दाखवल्यास मी राजकारणातून बाहेर पडणार असल्याचं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलंय.

तसेच मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर एकनाथ खडसे यांचं तोंड काळं करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही. मला बोलायला लावू नका, या शब्दांत महाजनांनी खडसेंना खडसावलंय.

आम्ही एअर इंडियाच्या चेअरमनला मारले वॉचमनला नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

एकनाथ खडसेंचे आरोप काय?
एका बातमीचा संदर्भ देत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केलायं. गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असून तिचं नाव आपल्याला माहित असल्याचं एकनाथ खडसेंनी दावा केला.

‘कमरेच्या खाली वार केल्याशिवाय जमत नाही’
कमरेच्या खाली वार केल्याशिवाय एकनाथ खडसे यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही, मला बोलायचं असेल त्यांना बाहेर पडणं मुश्किल होईल, त्यांचं सगळं संपलं असून दुकान बंद झालंय, त्यामुळेच ते बरळत असल्याचं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube