आम्ही एअर इंडियाच्या चेअरमनला मारले वॉचमनला नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut On Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँक आणि इतर अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे जाऊन तपासण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी एका बॅंक कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील झाला होता. त्यानंतर विरोधकांवरुन राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे आज राज ठाकरे यांनी या आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता यावरुन शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत मनसेच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. अशी टीका केली आहे. ते आज नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.
या वेळी संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली त्यांना शुभेच्छा. परंपरा मी सांगायला पाहिजे का ? मराठीचे आंदोलन म्हणणार नाही. आम्ही पण आंदोलन केले आहे. आम्ही लोकांच्या कान फडात मारले आहे. बँका, आस्थापने, राष्ट्रीय स्तरावर मराठी मुलांना यश मिळावे यासाठी क्लासेस चालविले. शिवसेना भवनात आम्ही मुलांची मानसिक तयारी केली नंतर आम्ही आंदोलन केली. असं संजय राऊत म्हणाले. तसेच आंदोलनासाठी मुलांची तयारी केली पाहिजे. असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
आम्ही एअर इंडियाच्या चेरमनला मारले वॉचमनला नाही
मनसे मारहाण प्रकरणावरुन देखील त्यांनी मनसेवर निशाणा साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आम्ही कुणाच्या कानफाडीत मारली नाही आम्ही एअर इंडियाच्या चेअरमनला मारले वॉचमनला नाही. प्रमुखांच्या कानाखाली मारली पाहिजे वॉचमनला मारून काय होणार? असं संजय राऊत म्हणाले. तर फडणवीस यांच्या कृपेने आंदोलन होत आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण, लायसन रद्द करा अन्…, भिसे कुटुंबियांची CM फडणवीसांकडे मागणी