वफ्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत संजय राऊतांची जोरदार बॅटींग मात्र शरद पवारांची अनुपस्थिती

Sanjay raut Agressive on BJP but Sharad Pawar will not present Waqf Board Bill Rajyasabha Discussion : केंद्र सरकारने काल बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Board Bill ) मंजूर केले. त्यानंतर आज हे विधेयक केंद्रीय मंत्री रिजीजू यांनी राज्यसभेत मांडलंय. राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 ची खरी कसोटी मानली जात आहे. या परिस्थितीत महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या खासदाराची हालचाल हे विधेयक मंजूर होण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकते. या दरम्यान एकीकडे विरोधी बाकावरून संजय राऊत सत्ताधारी भाजपला पुरून उरत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि खासदार शरद पवार मात्र सभागृहात हजर नाहीत. त्यामुळे त्यांचं मतदान होणार नाही.
कर्तृत्वाचा उत्सव, महाराष्ट्राच्या प्रगतीला सलाम! बीकेसी ग्राउंडवर होणार ‘सन्मान महाराष्ट्राचा 2025’
दरम्यान काल बुधवारी जेव्हा लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Board Bill ) मंजूर केले. या विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारला एनडीएच्या घटक पक्षांकडून पाठिंबा मिळाला आणि 288 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. तर विरोधात 232 मते पडली. मात्र या मतदानावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश बाळ्या मामा म्हात्रे हे गैरहजर होते. विशेष म्हणजे म्हात्रे हे या वक्फ दुरुस्ती विधेयक समितीचे सदस्य असताना देखील मतदानाला उपस्थित राहिले नाही. त्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे देखील उपस्थित राहणार नाहीत.
काय म्हणाले संजय राऊत?
यावेळी संजय राऊत म्हणाले की, मला वाटायचं आम्ही हिंदुराष्ट्र बनवणार आहोत पण आता, गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरु आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमालांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होते मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात. असं यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.
लाखांचा टप्पा सोडा महिलांना भुरळ पाडणारं ‘सोनं’ होणार स्वस्त; मिळणार 55 हजार प्रतितोळा?
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. हिंदूंच्या जमिनीची रक्षा करता येत नसेल तर मुसलमानांची काय करणार? तुमच्या सरकारला जमीन विक्रीच करायची आहे. असेही यावेळी संजय राऊत म्हणाले. तर यावेळी बोलताना संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला.
Pune News : गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार, अमित गोरखे
काश्मिरी पंडितांना अद्याप घरे आणि जमीन मिळालेली नाही मात्र त्यांची तुम्हाला चिंता नाही. असं संजय राऊत म्हणाले.तसेच जमिनीचा व्यापार करण्यासाठी तुम्ही विशेष धोरण राबवत आहात असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तर दूसरीकडे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येणार हे पहावे लागेल.