भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते, त्यांची नाराजी परवडणारी नाही, गिरीश महाजनांचे मोठे विधान

  • Written By: Published:
भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते, त्यांची नाराजी परवडणारी नाही, गिरीश महाजनांचे मोठे विधान

Girish Mahajan on Chhagan Bhujbal: महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)हे नाराज झालेत. नाराज झालेल्या भुजबळांनी माध्यमांसमोर आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवली. जहां नही चैना, वहॉं नही रहना, असं सूचक विधान भुजबळांनी केलं. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबद्दल मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं विधान केलं.

स्वप्नीलने प्रेक्षकांना दिलं खास गिफ्ट, दिसणार ‘या’ गुजराती चित्रपटात 

छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही, असं विधान गिरीश महाजन यांनी केल. ते आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलतांना गिरीश मराजन म्हणाले की, माझे आणि छगन भुजबळ यांचे कौटुंबिक संबंध आहेत. भुजबळ हे राज्यातील एक मोठे नेते आहेत. राज्यातील ओबीसींचा मोठा चेहरा म्हणजे भुजबळ आहेत. ते महायुतीत वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही, हे खरं आहे. मी काल त्याच्याशी बोललो आणि परवा सुद्धा बोललोय. आता पुन्हा दोन दिवसांनी मी नाशिकला जाणार आहे. तेव्हा मी त्यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत, आणि त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण ते राज्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत हे सर्वांना मान्य करावेच लागेल, असे गिरीश महाजन म्हणाले.

प्रत्येक घराला सोलर पॅनल अन् भरघोस सबसिडी, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंबद्दल जाणून घ्या सर्वकाही 

अवहेलनेचं शल्य बोचतयं – भुजबळ
नाशिकमध्ये बोलताना भुजबळ म्हणाले की, प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही. किती वेळा मंत्रिपदे आली आणि किती वेळा गेली. इतकचं नाही तर विरोधी पक्षातही बसावे लागले. पण ओबीसी समाजाने सरकारला एवढं दिल्यानंतर असं का? तुम्ही अवहेलना करण्याचं शल्य मनात टोचतयं, असं भुजबळ म्हणाले. मै मोसम नहीं, जो बदल जाऊ… मै इस जमीन से दूर कही और ही निकल जाऊ… मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेंक ना देना… हो सकता है, तुम्हारे बुरे दिनों मैं यही सिक्का चल जाए, या शायरीच्या माध्यमातून भुजबळांनी अजितदादांना सुचक इशाराही दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube