फडणवीसांसोबत व्यक्तिगत दुश्मनी नाही, तर केवळ तात्विक मतभेद; एकनाथ खडसेंचे संकेत?

फडणवीसांसोबत व्यक्तिगत दुश्मनी नाही, तर केवळ तात्विक मतभेद; एकनाथ खडसेंचे संकेत?

Eknath Khadse Statement On Devendra Fadnavis : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ खडसे यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दुश्मनी नाही, तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र, व्यक्तिगतरित्या संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले मतभेद पुढील काळात मिटू शकतात, असं देखील खडसे (Eknath Khadse) म्हणाले आहेत.

‘मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल…’; २०१४ पासूनची आकडेवारी दाखवत बावनकुळेंचा पवारांवर हल्लाबोल

फडणवीस आणि माझ्यात व्यक्तिगत वैर नाही, असं एकनाथ खडसे यांनी (Maharashtra Politics) म्हटलंय. फक्त काही तात्विक मतभेद आहेत, येणाऱ्या काळात ते मिटतील. माझे आणि फडणवीसांचे व्यक्तिगत संबंध चांगले असल्याचं वक्तव्य, खडसे यांनी केलंय. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा भूवया उंचावल्या आहेत.

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, व्यक्तिगत दोष नसतो. व्यक्तिगत काही नसतं. राजकीयदृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत दुश्मनी असते, असा काही प्रकार नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे तात्विक मतभेद होते. आजही आहेत, पुढच्या काळात कदाचित ते तात्विक मतभेद मिटू देखील शकतील. म्हणजे आमच्यात काही भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध चालल्यासारखं नसतं. हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहोत. आजही माझे अन् फडणवीसांचे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

मोठी बातमी! राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच छळ केला तसेच राजकीय कारकीर्द संपवल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यानंतर खडसे यांनी सौम्य भूमिका घेतल्याचं समोर आलंय. देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद आहेत. व्यक्तिगत दुश्मनी कधीच नव्हती. भूतकाळात राजकीय परिस्थितीमुळे घटना घडल्यात. आजच्या घडीला परिस्थितीत राजकारणातील वैरभाव कायम ठेवून चालत नसल्याचं देखील खडसेंनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube