गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज अवैध, कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय

Gopichand Padalkar; गोपीचंद पडळकर यांचा सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवला.

Gopichand Padalkar Sangli District Bank Election Nomination Invalid

Gopichand Padalkar Sangli District Bank Election Nomination Invalid

Gopichand Padalkar Sangli District Bank Election Nomination Invalid: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा मार्ग बंद झाला आहे. जत सोसायटी गटातून त्यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पडळकरांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक कोसळला! भारतीय बाजाराला धोक्याची घंटा की संधीचा काळ?

उमेदवारीला न्यायालयात आव्हान का दिलं?

पडळकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवला होता. या निर्णयावर आक्षेप घेत माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली. पडळकर यांच्या सहकारी संस्थांमधील सभासदत्वाबरोबरच संचालकपदाच्या अनुभवावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

दिवाळीच्या तोंडावरच महागाईचा भडका; 42 पैकी 41 दैनंदिन वस्तुंच्या किमतीत झाली वाढ

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संबंधित संस्थेचे किमान दोन वर्षांचे सभासदत्व आणि व्यवस्थापन समितीवर एक वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक असल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. पडळकर यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली असताना त्याआधी त्यांना संबंधित सोसायटीचे सभासदत्व कसे मिळाले, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला. निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील त्यांचे सभासदत्व आणि संचालकपदाचा अनुभव पात्रतेच्या निकषांत बसतो का, यावरही आक्षेप घेण्यात आला होता.

कागदपत्रे देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

न्यायालयातील सुनावणीनंतर विक्रमसिंह सावंत यांनी पडळकरांना कथितरीत्या चुकीची कागदपत्रे देणाऱ्यांविरोधातही फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

शक्तिप्रदर्शनानंतर उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका खासदार विशाल पाटील यांनी मांडली होती. मात्र, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील राजकीय चुरस वाढली होती.

‘ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर व्हाईट ज्युनियर काळाच्या पडद्याआड; वयाच्या 34 व्या वर्षी निधन!

पडळकर यांच्या अर्जाच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घडामोडींमुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचीही चर्चा रंगली होती.

आता पडळकरांचा अर्ज अवैध ठरवण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. या निर्णयानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते आणि त्याचा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version