Download App

Gopichand Padalkar : ‘संजय राऊत हा वेडा झालेला माणूस’; पडळकरांची टीका

  • Written By: Last Updated:

सांगली : ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Elections) मोठं भाष्य केलं आहे. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून वक्तव्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था संजय राऊत यांची झालेली आहे, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलतांना पडळकरांनी सांगितले की, संजय राऊत पूर्ण वेडा झालेला माणूस आहे. ठाकरे गटाची राज्यात जी वाताहात झाली, त्यानंतर आता तरी त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यांनी शिवसेनेची राखरांगोळी केली आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, शरद पवारांच्या हातात हात घालून शिवसेना संपवून सुद्धा संजय राऊत शांत राहायला तयार नाहीत. ते रोज अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेगटावर टीका करत आहेत. विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं, निवडणूक आयोगाला अर्वाच्या भाषेत बोलणं हे योग्य नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य वेळी उत्तर देईल, असेही पडळकरांनी सांगितले.

पडळकर म्हणाले, त्यांच्या सांगलीच्या दौऱ्यात राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यासोबत होते. त्यामुळे यांची अवस्था म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी झाली आहे अशी तिखट टीका देखील पडळकर यांनी केली आहे. राज्यातलं राहील बाजूला आणि हे लोक आता देशातली भाषा बोलायला लागलेली आहेत, त्यामुळे त्यांना आता कृपामय या ठिकाणी दाखल करण्याची नितांत गरज आहे असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदी आणि यांच्या विरोधात विरोधी पक्षनेत्यांची मोट बांधणं गरजेची असून त्यासाठी शिवसेने पुढाकार घेण्यास सुरुवात केली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याशिवाय उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात यावे अशी आमची इच्छा असून त्यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी चेहरा उत्तम आहे. त्याचा खरपूस समाचार पडळकरांनी घेतला.

Holi Celebration : ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा!

दरम्यान, 9 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये शरद पवारांचाही समावेश आहे. या त्यांनी इडी, सीबीआय सारख्या सरकारी संस्थांचा चुकीचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळं देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालला असल्याची खंत यावेळी विरोधकांनी व्यक्त केली आहे. यावर बोलतांना पडळकर म्हणाले, शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या उलट करतात, आणि त्यांच्या कृतीतून ते दिसून येईल, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावाला आहे.

Tags

follow us