Download App

कर्डिले यांनी डाव टाकला ! काँग्रेसच्या माजी खासदाराचा नातू भाजपमध्ये

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Politics : राज्यातील राजकारणात आपण आमदारांची फोडाफोडी पाहिली आहे. आता भाजपचे नेत्यांनी स्थानिक पातळीवर फोडाफोडी सुरू केली आहे. आता नगर तालुक्यात भाजपचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनीही बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. स्वर्गीय माजी खासदार दादापाटील शेळके (Ankush Shelke) यांचा नातू अंकुश शेळके यांना त्यांच्या समर्थंकासह भाजपमध्ये घेतले आहे. नगर तालुक्यातील महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा धक्का आहे. (grandson of dadapatil-shelke ankush shelke join bjp)

नगर तालुक्यातील खारे कर्जुनेचे उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर अमृत शेळके, संजय बेकार्से, प्रकाश लांडे, विजय निमसे, अक्षय निमसे, बबनराव करंडे, अरुण भोर,महेश दळवी, अजिंक्य पानसंबळ, रोनित कोतकर, अनिकेत कोतकर, हर्षल म्हस्के, अभिजित निमसे यांचा प्रवेश झाला आहे. शिवाजी कर्डिले यांनी हे प्रवेश घडवून आणले आहेत. दादापाटील शेळके हे काँग्रेस पक्षाचे खासदार होते. त्यांचा मुलगा रावसाहेब शेळके हे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. तर दादापाटील शेळके यांचा पुतण्या प्रताप शेळके हे मागील टर्मला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते कट्टर समर्थक आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अंकुश शेळके हे उमेदवार होते. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


Pune BJP : चिंचवडमध्ये भाजपात दुफळी; जगतापांचं नाव येताच विरोध उफाळला

नगर तालुक्यात कर्डिलेविरुध्द काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाआघाडी आहे. दादापाटील शेळके व कर्डिले यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झालेला आहेत. शेळके यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे प्रताप शेळके यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व केले आहे. त्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेकदा कर्डिलेंना धक्के बसले आहेत. सध्या बाजार समिती व महत्त्वाच्या ग्रामपंचायती, सोसायट्या या कर्डिलेंच्या ताब्यात आहेत.

बारामती जिंकण्याचा भाजपचा चंग! पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमला ‘खास’ शिलेदार

आगामी काळात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. नगर तालुक्यातील खारेकर्जुने, देहऱ्यासह महत्त्वाची गावे ही पारनेर मतदारसंघात आहेत. त्यामुळे येथून आपला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्यासाठी कर्डिलेंनी ही खेळी केली आहे. कर्डिले हे अंकुश शेळके यांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उतरून शकतात. त्यामुळेच कर्डिले यांनी युवा नेते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेतले आहेत. असे असले तरी शिवाजी कर्डिले यांचा पुतण्या रोहिदास कर्डिले हा मात्र महाविकास आघाडीत आहे.

Tags

follow us