Pune BJP : चिंचवडमध्ये भाजपात दुफळी; जगतापांचं नाव येताच विरोध उफाळला

Pune BJP : चिंचवडमध्ये भाजपात दुफळी; जगतापांचं नाव येताच विरोध उफाळला

BJP District President Appointment : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे.

या निवडींना सुरुवातीलाच ग्रहण लागले आहे. पुण्यातूनच विरोधाचे स्वर उमटले आहेत. पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. पण, त्यांच्या या नियुक्तीला पक्षातूनच विरोध केला जात असल्याचे समोर आले आहे.

बारामती जिंकण्याचा भाजपचा चंग! पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमला ‘खास’ शिलेदार

आ. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यावेळीही उमेदवार म्हणून शंकर जगताप यांचे नाव पुढे आले होते. मात्र, त्याच वेळी त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला होता. वाद वाढत असल्याचे पाहून अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले. या घडामोडींनंतर आता भाजपने त्यांना अध्यक्षपदी संधी दिली आहे. मात्र आताही त्यांना विरोध होत आहे. या पदासाठी इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनीच घरचा आहेर दिला आहे. त्यांनी आपली नाराजी थेट पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे. शंकर जगताप यांची निवड म्हणजे जगताप कुटुंबाला झुकतं माप असून यातून परिवारवाद दिसून येतो, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात असून भाजपाच्या धोरण आणि तत्वांनाच तिलांजली दिली जात आहे. शहरातील जुने आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हा निर्णय पटलेला नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची यामुळे घुसमट होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

दरम्यान, या यादीत अनेक फेरबदल झाल्याचे दिसत आहे. तर नव्या चेहऱ्यांना पुढे आणले आहे. नागपूर शहराध्यक्षपदासाठी बंटी कुकडे तर जिल्हाध्यक्षपदासाठी सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एका जिल्ह्यात दोन ते तीन अध्यक्ष दिले आहेत.

नगरमध्ये जुन्या नेत्यांवर विश्वास 

यामध्ये पुणे शहर- धीरज घाटे, पुणे ग्रामीण (बारामती) – वासुदेव काळे, पुणे (मावळ) – शरद बुट्टे पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. अहमदनगर शहराध्यक्षपदी अॅड. अभय आगरकर, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube