IPL मध्ये पराभव गुजरातचा पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आनंद गगनात मावेना!

Gujarat’s defeat in IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यांमध्ये काल (ता.29) रात्री चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं. दरम्यान, महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेल्या चेन्नईचा विजयी जल्लोष मात्र महाराष्ट्रात पाहायला मिळाला. यामध्ये चेन्नईचा फॅन फॉलोईंग महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमी म्हणून मोठा आहे. […]

Untitled Design (38)

Untitled Design (38)

Gujarat’s defeat in IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यांमध्ये काल (ता.29) रात्री चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं.

दरम्यान, महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेल्या चेन्नईचा विजयी जल्लोष मात्र महाराष्ट्रात पाहायला मिळाला. यामध्ये चेन्नईचा फॅन फॉलोईंग महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमी म्हणून मोठा आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे आणि त्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या (ठाकरे) नेते मंडळींकडून चेन्नईने गुजरातचा पराभव केल्यानंतर तोंड भरून सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

आयपीएल ही प्रतियोगिता जरी व्यावसायिक आणि मनोरंजनासाठी असली तरी या सामन्याच्या माध्यमातून राजकीय नेते एकमेकांना उपरोधिक टोमणे मारताना दिसत आहेत. अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चेन्नईचा विजयाचा जल्लोष केलाच. मात्र, गुजरातचा पराभव झाला याचा अधिक आनंद व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यांनी ट्विट करत चेन्नई सुपर किंग्जचं अभिनंदन केलं. त्यांनी लिहिलं की, आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावल्याबद्दल कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाचं मन:पूर्वक अभिनंदन. अखेरच्या षटकात तर रविंद्र जडेजाने केलेली अफलातून आणि रोमहर्षक खेळी कायम स्मरणात राहिल, असं ट्विट केलं.

तर कॉंग्रेस समर्थक प्रज्ञा पवार यांनी लिहिलं की, चेन्नई जिंकल्यापेक्षा गुजरात हरली, याचा मनस्वी आनंद झाला. देव करो २०२४ ला पण गुजरात हरो, असं ट्विट केलं.

दरम्यान, कालच्या सामन्यासारखीच महाराष्ट्राच्या राजकारणात देखील आजघडीला भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी आरपारची लढाई पाहायला मिळत आहे. त्यात भाजपचा शीर्ष नेतृत्व हे गुजरात मधूनच येत असल्याने तसेच, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हे ‘आयसीसी’चे अध्यक्ष म्हणून या सामन्याला उपस्थित असताना गुजरातच्या या पराभवानंतर केल्या जाणाऱ्या जल्लोषाला एक राजकीय किनार आहे.

यामुळे अनेक राजकीय नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी गुजरातच्या पराभवाची अर्थात भाजपच्या ही सुरुवात झाल्याचही व्हाट्सअप स्टेटस ठेवत अप्रत्यक्षरीत्या भाजप नेत्यांना टोमणे मारले आहेत.

संसद भवनाच्या वादात अजितदादांचा वेगळाच सूर; म्हणाले, शेवटी आम्हाला एक छान…

महाराष्ट्रातून चेन्नई टीमला सपोर्ट का?
भारताला दोन विश्वकप मिळवून देणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची लोकप्रियता देशभर आहेच, मात्र त्यातही तो ज्या संघाचा नेतृत्व करतोय त्या चेन्नई सुपर किंग संघामध्ये सुमारे सात मराठी खेळाडू खेळतात. त्यामुळे आपसूकच महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींकडून चेन्नईला भरभरून सपोर्ट मिळत आहे.

दरम्यान, आयपीएल ही प्रतियोगिता व्यावसायिक जरी असली तरी टीमच्या नावामुळे त्याला प्रादेशिक टच आहे. नेमका हाच मुद्दा पुढे करून तमिळनाडू येथील एका आमदाराने चेन्नई संघ बंद करा या संघामध्ये तमिळनाडूचे क्रिकेटर किती आहेत, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी याच्याही चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. तर महाराष्ट्राचा मुंबई संघ आहे. मात्र, त्यामध्ये मराठी खेळाडू किती, असाही युक्तिवादही अनेक क्रिकेट रसिकांकडून केला जातो.

Exit mobile version