Download App

अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही, दहा वेळा माझी फाईल माघारी…; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

अर्थखात्यासारख नालायक खातं नाही. दहा वेळा माझी फाईल अर्थखात्याकडून माघारी आली. वारंवार फाईल निगेटिव्ह होऊन यायची

  • Written By: Last Updated:

Gulabrao Patil : शिंदे गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (Ajit Pawar) अर्थ खाते गेल्याने वारंवार टीका केली होती. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, अशी ओरड सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांनी केली होती. दरम्यान, आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही अर्थखात्यावर भाष्य केलं. अर्थखात्यासारखं नालायक खातं नसल्याची टीका त्यांनी केली.

विधानसभा निवडणूक! भाजपची रणनीती ठरली; 21 नेत्यांवर जबाबदारी, तर गडकरींच्या हाती कमान 

आज (दि. 6) जळगावात हातपंप व वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी युनियनतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले, अर्थखात्यासारख नालायक खातं नाही. दहा वेळा माझी फाईल अर्थखात्याकडून माघारी आली. वारंवार फाईल निगेटिव्ह होऊन यायची. पण मी देखील पक्का आहे. गेली फाईल की फॉलोअपसाठी माणूस पाठवायचो. मी पिच्छाच सोडला नाही. याच पाठपुराव्यामुळे आमचं कामं झालं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. फॉलोअप घेणारे लोकं माझ्या सोबत नसते तर कदाचित मी फाईलकडे दुर्लक्ष केलं असंत, असंही ते म्हणाले.

Video : वस्तादाला राखून ठेवलेला डाव खेळण्याची वेळ आणू नका; अजितदादांनी सावध केलं 

दोन अडीच महिन्यांत येणाऱ्या विघ्नासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थ ही करावा लागतो. आमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी लोकांनाही सांगा. मला खात्री आहे की तुम्ही न सांगता ते सांगाल, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तुम्ही आज मला सन्मानासाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले, वडील काँग्रेसचा प्रचार करत होते, मी बाळासाहेबांच्या सेनेचा प्रचार करत विजयी झालो. सरकारमध्ये राज्य मंत्र्याला फारसे करून घेता येत नाही. पाणी पुरवठा खातं आले आणि आमच्या लोकांना महत्व आहे. जनतेला पाणी पाजण्याचं काम करण्याचे भाग्य मला मिळालं. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचं आहे, असं पाटील म्हणाले.

मी देवदुत नाही, गरीबी जवळून पाहिली. कष्ट करणाऱ्याचे पैसे खाणाऱ्यांचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असंही ते म्हणाले.

follow us