शरद पवारांना आणखी एक हादरा! विदर्भातला बडा नेता अजित पवारांकडे; म्हणाले, मनावर दगड ठेवून….

शरद पवारांना आणखी एक हादरा! विदर्भातला बडा नेता अजित पवारांकडे; म्हणाले, मनावर दगड ठेवून….

Dr. Rajendra Shingane : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांच्या गटात नेमके किती आमदार आहेत, याची स्पष्ट आकडेवारी अद्याप समोर आली नसली, तरी अजित पवारांच्या गटातील आमदारांची संख्या अधिक असल्याचं समोर येत आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आणि आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंगणेंच्या या निर्णयामुळं केवळ पक्षातच नाही, तर सत्ताधारी पक्षातही खळबळ उडाली आहे. (Mla Rajendra Shingane Finally Decided To Go With Ajit Pawar)

राजेंद्र शिंगणे हे 5 जुलै रोजी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर सुरू झालेले राजकारण पाहून त्यांनी अशा राजकारणाचा वीट आला. राजकारणापेक्षा शेती केलेली बरी असं विधान केलं होतं. दरम्यान, अनेक नेते हे अजित पवार गटात जात असतांना शिंगणेंननी हो-नाही करत अखेर अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय़ घेतला. केवळ आणि केवळ बिकट परिस्थितीतील जिल्हा सहकारी बँकेसाठी आपण अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्याबद्दल आदर असूनही अपरिहार्य परिस्थितीत शेतकरी बँक वाचवण्यासाठी अगदी मनावर दगड ठेऊन आपण हा निर्णय घेतल्याचं त्यानी सांगितलं.

Amol Kolhe On Shivajirao Adharao Patil: अमोल कोल्हे यांची आढळरावांचे छंद काढण्याची धमकी 

ते म्हणाले, परवा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, अजितदादांनी सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा जिल्हा बँकेला मदत करण्याची मागणी मी त्यांच्यापुढे रेटली. त्यांनी काही तासांनंतर ठाम आश्वासन देत जिल्हा बँकेचा प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केलं. जिल्हा बॅंक आणि लाखो शेतकऱ्यांचे हित, सहकारी संस्था, सोसायट्या वाचवण्यासाठी बॅकेला ३०० कोटीचं सॉफ्ट लोन ही आमची मागणी आहे. ते मिळाले तरच बॅंक वाचू शकते. अन्यथा ती वाचणे अशक्यच आहे. अजित पवारांनी तसा शब्द दिला आणि ते शब्द पाळणारे नेते आहेत. त्यामुळे अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं शिंगणेंनी सांगितलं.

राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. अखेर आमदार राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube