Gulabrao Patil On Udhav Thackery : ‘लोक आम्हाला गद्दार म्हणतात मात्र आज देखील आमच्या मस्तकावर बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा फोटो आहे. उद्धव ठाकरेंनी काय केले आहे? बाळासाहेब कधी नगरसेवक झाले नाही, बाळासाहेब कधी आमदार झाले नाही, पण त्यांच्याकडे आमदार, नगरसेवक, पंतप्रधान यायचे. तुम्ही मुख्यमंत्री झाले. पण गाडी चालवण्याचा तरी अनुभव पाहिजे. कधी गाडी कुठेही ठोकून देणार आणि काका लायसन्स नाही. असं म्हणणार का? अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
चोपडा तालुक्यातील आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून 65 कोटीचे लासुर गावासह नऊ गावातील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले हे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लासूर येथे करण्यात आले. भूमिपूजनानंतर झालेल्या भाषणामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केली.
काँग्रेसचे दूत ‘मातोश्री’वर, ठाकरेंची भेट घेत दिले दिल्लीवारीचे आमंत्रण
यावेळी पुढे पाटील म्हणाले की, ‘मला मंत्री करण्याआधी तीन-चार वेळा तपासलं तेव्हा मला मंत्री केलं तेही पहिला टप्प्यात नाही. पण तुम्ही नगरसेवक नाही, तुम्ही सगळ्यांना आमदार केलं. अन् स्वतः डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. त्याच्यात कोरोना याराना येऊन गेला.’
पंतप्रधान दाढीवाला मुख्यमंत्री दाढीवाला पाणीपुरवठा मंत्री दाढीवाला काय माहिती जे माझ्या नशिबात होतं ते अरुणभाईच्या नशिबात नव्हतं. मी महाराष्ट्रामध्ये 38 हजार गावांना पाणी देत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 801 गावांना पाणी देत आहे. मी जळगाव जिल्ह्यामुळे पालकमंत्री झालो. पहिले जळगाव जिल्ह्याचे भल करून मग महाराष्ट्राच भल करू.