काँग्रेसचे दूत ‘मातोश्री’वर, ठाकरेंची भेट घेत दिले दिल्लीवारीचे आमंत्रण

काँग्रेसचे दूत ‘मातोश्री’वर, ठाकरेंची भेट घेत दिले दिल्लीवारीचे आमंत्रण

Venugopal Meets Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोठ्या हालचाली सध्या सुरु आहे. सभा, गाठीभेटी यांना वेग आला आहे. नुकतेच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनतर वेणुगोपाल यांनी ठाकरेंसह पत्रकार परिषद घेत या भेटीमागील उद्देश सांगितला.

सध्या सावरकरांच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका व राहुल गांधी यांची भूमिका या वेगवेगळ्या असल्याने आघाडीला तडा जाऊ नये यासाठी आता दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरु केल्या आहेत. याच अनुषंगाने काँग्रेस नेते के.सी वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासह खासदार संजय राऊत आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती.

दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत वेणुगोपाल यांना राहुल गांधी ‘मातोश्री’वर येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना वेणूगोपाल म्हणाले, आम्ही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तसेच ठाकरे यांना दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे हे दिल्लीत आल्यानंतर राहुल गांधी हे निश्चितपणे मुंबईत येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा ठाकरेंच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. आम्ही मोदींच्या हुकूमशाहीविरोधात लढणार आहोत. तसंच उद्धव ठाकरे यांनी वेणुगोपाल यांचे आभार माणून देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

फिल्म इंडस्ट्रीत मोठे सेक्स रॅकेट उघड, कास्टिंग डायरेक्टर Aarti Mittal ला बेड्या

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, फक्त विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाचे समीकरण नाही. देशात विविध पक्ष आणि त्यांची विचारसरणी आहे. या पक्षांना एकत्रितपणे घेऊनसोबत जायचे आहे. त्याला लोकशाही म्हणतात. शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे असेही उद्धव यांनी म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube