Harshvardhan Sapkal : गोळवलकरांनी (Golwalkar) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह लिखान केलं, सावरकरांनीही घाणेरंड आणि अश्लील लिखान केलं आणि त्याचं विचारांचे पाईक म्हणून मुख्यमंत्री काम करत असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केला. भाजपचा हेतू साध्य करण्यासाठी भिंडेंसारखी किडे प्रवृत्ती कार्यरत आहे, असंही ते म्हणाले.
थांबू नका…’लवकरच मुले जन्माला घाला’; तामिळनाडूच्या मु्ख्यमंत्र्यांचं फर्मान, बैठकच बोलावली
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास यामुळं छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आलं. दरम्यान, काँग्रेसने राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, हा चित्रपट अद्यापही करमुक्त करण्यात आलेला नाही. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुह मे राम आणि बगल मे छूरी, अशी भाजपची एकूणच कार्यपद्धती आहे. संविधानाला अभिप्रेत असलेला समाजवाद, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, वारकरी संप्रदाय, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिव-शाहू-फुले-आंबेडकर या सर्व विचारांच्या विपरीत काम करणं हे भाजपचं आणि आणि त्यांच्या मित्र पक्षांचा मूळ हेतू आहे, असा आरोप सपकाळ यांनी केली.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा… रविकांत तुपकरांकडून आंदोलनाचा बॉम्ब फोडण्याचा इशारा
यावेळी सपकाळ यांनी संभाजी भिडे यांच्यावरही टीका केली. हे आंबेवाले बाबा असतील, हे कुंकुवाले, हे जे किडे आहेत, ज्यांना भिडे म्हणतात. त्यांच्या डोक्यात जातीभेदाचे आणि मनुस्मृतीचे किडे पडले आहेत, त्यामुळंच ते बेताल वक्तव्य करत असतात, अशी टीकी सपकाळ यांनी केली. भाजपचा हेतू साध्य करण्यासाठी भिंडेसारखी किडे प्रवृत्ती कार्यरत आहे, असंही ते म्हणाले.
सपकाळ म्हणाले, छावा चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संभाजी महाराजांचे प्रारूप आणि स्वरूप समाजापुढे येत आहे. शिवजयंतीपासून काँग्रेसची मागणी आहे की, छावा चित्रपट करमुक्त करावा, त्यातील जीएसटी हा रद्द करावा. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार चित्रपट करमुक्त करण्यास तयार नाही. याचं कारण काय तर चिटणीसांच्या बखारीत संभाजी महाराजांविरुद्ध लिखान करण्यात आलं. इतकेच नाही तर गोळवलकर गुरुजींनी ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह आणि अत्यंत निराधार बदनामीकारक मजकूर लिहिला आहे. सावरकरांनीही संभाजी महाराजांविरुद्ध अतिशय घाणेरडे आणि अश्लील लिखान केलेलं आहे. या सर्वांच्या विचाराचे पाईक म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ काम करत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.