Download App

… म्हणून हसन मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडली, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar On Hasan Mushrif :  कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रोहित

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar On Hasan Mushrif :  कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले की, कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. खाजगी कंपन्यांना कामगार भरतीसाठी सहा हजार दोनशे कोटींचा खर्च करण्यात आला आणि त्यातून अडीच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप रोहित पवार यांनी केला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,ब्रीक्स, क्रीस्टल, एस ओ टु आणि बी व्ही जी या कंपन्यांना ही कंत्राटे देण्यात आली होती. त्यापैकी क्रीस्टल कंपनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांची आहे तर ब्रीक्स कंपनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची आहे. हसन मुश्रीफ यांच्या ब्रीक्स इंडीया कंपनीला बाराशे कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली होती त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली. याच कंपनीवर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आरोप केले होते. या खाजगी कंपन्यांना कंत्राटे दिल्यानं युवकांची संधी नाकारण्यात आली आणि त्यामुळे अनेक नेते महायुतीत गेले असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.

लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही

या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी लाडकी बहिण योजनेला (Ladki Bahin Yojana) आमचा विरोध नाही, मात्र ही योजना व्यवस्थित राबवावी आणि त्याची व्याप्ती वाढवावी.  महाविकास आघाडी  सत्तेवर आल्यानंतर आम्ही याची व्यप्ती वाढवू असं देखील रोहित पवार म्हणाले. तसेच सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत पण इतर योजनांसाठी पैसे नाहीतअसा टोला देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्य सरकारला लावला.

तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीने प्रत्येक मतदारसंघात जवळपास 60 ते 70 कोटी रुपये खर्च केले आणि विधानसभा निवडणुकीत देखील असाच खर्च करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण हा गरिबांचा पैसा आहे.

कर्जत – जामखेडमध्ये पवार विरुद्ध पवार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा 

वेगवेगळ्या विविध विकास कामांसाठी जी पस्तीस हजार कोटी रुपयांची टेंडर काढण्यात येतील.  त्यातुन दहा टक्के रक्कम म्हणजे साडेतीन हजार कोटी रुपयांचा मलीदा खाण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप देखील यावेळी रोहित पवारांनी केला.

follow us