कर्जत – जामखेडमध्ये पवार विरुद्ध पवार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार देता येईल याची सध्या सर्व राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. यातच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माझ्या विरोधात महायुतीकडून (Mahayuti) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तिकीट मिळणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले की, केंद्रातील गुजराती नेत्यांनी दादांवर दबाव आणला होता त्यामुळे त्यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. माझ्या मतदारसंघात देखील असाच दबाव आणला जाऊ शकतो. माझ्या मतदारसंघात महायुतीकडून जोर लावण्यात येत आहे त्यामुळे अनेक उमेदवार माझ्या विरोधात उभे राहू शकतात. काही सर्वेक्षणात माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उभे करता येईल याची चाचपणी सुरू आहे असा दावा रोहित पवार यांनी यावेळी केला.
तसेच भाजपचा एखादा मोठा नेताही माझ्या विरोधात उभा राहू शकतो मात्र माझ्या मतदारसंघातील जनता निष्ठेला महत्त्व देईल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहिला हा विश्वास असं देखील रोहित पवार म्हणाले.
बारामतीचा निर्णय शरद पवार घेणार तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून कोणाला उमेदवारी द्याची याचा निर्णय शरद पवार घेतील असेही यावेळी रोहित पवार म्हणाले. याच बरोबर जर अजित पवार मनातून करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. ते परत येतील का हे माहीत नाही, याचा निर्णय शरद पवार ठरवतील.
दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघ घोषित, श्रेयस अय्यर, शुभमन गिलसह ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी
पण जर अजित पवार 200 कोटी रुपये खर्च करून नेमलेल्या डीझाईन बॉक्स या कंपनीने सांगितल्याप्रमाणे बोलत असतील तर अजित पवार खुपचं बदलले आहेत असं म्हणावं लागेल. पण जर इतरांच्या सल्ल्याने अजित पवार बोलत असतील तर अजित पवारांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग काय? असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.