पैसे परत घेऊनच दाखव, तुझा कार्यक्रमच करते; सुप्रिया सुळेंनी राणांना धमकावलंच
Supriya Sule On Ravi Rana : मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पंधराशे रुपये परत घेऊनच दाखव मग तुझा कार्यक्रमच करते, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी थेट धमकावलंय. दरम्यान, अमरावतीत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना रवी राणा यांनी आशिर्वाद दिला नाही तर लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेणार असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. राणा यांच्या या विधानानंतर राज्यात टीकेची झोड उठली. आता सुप्रिया सुळेंनीही एका कार्यक्रमादरम्यान बोलताना रवी राणांना धमकावलंय.
संजयकाकांच्या राजकारणावर दुसरा घाव? रोहित पाटील ‘तासगाव’साठी तयार!
आमदार रवी राणा यांनी काल मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांना संबोधित करीत होते. यावेळी बोलताना रवि राणा यांनी पैसे परत घेण्याबाबतचं वादग्रस्त विधान केलं होतं. रवि राणा यांच्या या भाषणाचा व्हिडिओच खासदार सुळे यांनी भाषणादरम्यान, जनतेला ऐकवला. त्यानंतर सुळे म्हणाल्या, राणा यांच्याबाबत मी काही बोलू शकत नाही. आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरच्या लोकांना सांगणारा भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल तर आम्ही बहिणी परवडल्या. आम्हाला काहीही नको भावाने प्रेम दिलं लुगड्यावरच आम्ही खुश असतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
रिलायन्सच्या 42 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; रिपोर्टने सगळेच केले उघड
तसेच तुझे 1500 रुपये नको रे बाबा, मला पैसे परत घेणाऱ्या भावाला आदराने सांगायंचय, महाराष्ट्रातल्या लेकीला अशी धमकी दिली तर तुम्ही पंधराशे रुपये घेऊनच दाखव, मग बघते तुझा काय कार्यक्रम करायचायं, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आमदार रवि राणा यांना धमकावलंय. महाराष्ट्राता तुम्ही गलिच्छ राजकारण सुरु केलंय ते बंद केल पाहिजे, तुम्ही तुमच्या खिशातून 1500 रुपये देत नाहीत, असंही सुळे म्हणाल्या आहेत.
त्यावेळी फडणवीस साहेब जन्मालादेखील आले नव्हते; डोक्याला हात लावत भुजबळांनी दिलं उत्तर
काय म्हणाले होते आमदार रवि राणा?
आमचं सरकार आलं तर आम्ही 1500 रुपयांवरुन 3 हजार रुपये करु, मात्र तुम्हा मला आशिर्वाद नाही दिला तर मीही तुमचा भाऊ आहे, तुमच्या खात्यातून ते पंधराशे रुपये परत घेईन, असं रवि राणांनी लाडक्या बहिणींना उद्देशून म्हटलं होतं.