हसन मुश्रीफ लढवय्ये नेते आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी – संजय राऊत

मुंबई : ‘जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यार केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकतात. त्यात अनेकांना अटकही झाली त्यात मी ही होतो. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकायची भाषा भाजपच्या काही लोकांनी केली होती. पण भावना गवळी, यशवंत जाधव इतर काही लोक सरकारमध्ये सामिल झालेल्यांना दिलासा मिळतो.’ ‘जे विरोधी पक्षात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास […]

SANJAY RAUT 22

SANJAY RAUT 22

मुंबई : ‘जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यार केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकतात. त्यात अनेकांना अटकही झाली त्यात मी ही होतो. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकायची भाषा भाजपच्या काही लोकांनी केली होती. पण भावना गवळी, यशवंत जाधव इतर काही लोक सरकारमध्ये सामिल झालेल्यांना दिलासा मिळतो.’

‘जे विरोधी पक्षात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकतात. दबावाचं राजकारण केलं जातं. हसन मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत. ते या सर्व संकटातून सुखरूप बाहेर येतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत.’ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील सत्तासंघर्षावर काल सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर दोघांच्या संमतीने 14 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये देखील दोन तास सुनावणी झाली. निवडणूक आयोगाचा निकाल लागू शकत होता. पण आम्हीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये अशी मागणी केली.

स्वतंत्र म्हणून घेणाऱ्या स्वायत्त संस्थांवर जो राजकीय दबाव आहे. तो त्या घटनेच्या खुर्चीवर बसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता राजकीय दृष्ट्या देशाचे वातावरण निर्मळ राहिलेलं नाही.’ असंही संजय राऊत हे म्हणाले.

मोहन भागवत आमचे मार्गदर्शक नेते
मोहन भागवत यांच्या हिंदू-मुस्लिम एकतेच्या वाक्याचा स्वागत करतो. आम्ही पण तेच बोलतो 20 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या हे मुसलमानांची आहे. राजकारण करण्यासाठी व इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही सारखे हिंदू-मुसलमान करणार असाल तर या ठिकाणी देश हा तुटून जाईल.’

‘लोकांच्या मनात भीती निर्माम करून आपण जास्त वेळ राजकारण करू शकत नाही. आमच्या मार्गदर्शक नेता मोहन भागवत यांनी ही गोष्ट पुढे ठेवली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देखील यावरती लक्ष घेतलं पाहिजे.

‘सामनामध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या हात गिरीश महाजन यांनी जळगावत मुख्यमंत्र्यांच्या समोर एक विधान केलेलं आहे. शिवसेना फोडण्यचं आमचं मिशन होतं आणि त्यांनी पूर्ण केलं. त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केल. ही मोठी गोष्ट आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली.’

‘या गोष्टीवरती काल गिरीश महाजन यांनी पडदा टाकला व भाजपच यासाठी कारणीभूत आहे असे सांगितले. शिवसेना भाजपला शिवसेना फोडायची होती. शिवसेना फोडाल्याशिवाय महाराष्ट्राचे तीन तुकडे करता येणार नाही असं गिरीश महाजन यांना सुचवायचं होतं. गिरीश महाजन यांचे मी आभार मानतो. भारतीय जनता पार्टीतील एका नेत्याने खरं सांगितलं की. शिवसेना कोणी फोडली. अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

Exit mobile version