Eknath Shinde : ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे डॉन नाही, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : अधिवेशनात प्रश्न मांडाला असता. मला मुख्यमंत्र्यांनी माझ्या चौकशीची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून असा धमकीवजा सुर चांगला नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे डॉन नाहीत. डॉनला लोक घाबरतात पण मुख्यमंत्री हे मायबाप असतात. तसेच मी विरोधक जरी असलो तरी मी त्यांचा वयैक्तिक विरोधक नाही. मी वैचारिक विरोधक आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र […]

Untitled Design (17)

Jitendra Awhad

मुंबई : अधिवेशनात प्रश्न मांडाला असता. मला मुख्यमंत्र्यांनी माझ्या चौकशीची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून असा धमकीवजा सुर चांगला नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे डॉन नाहीत. डॉनला लोक घाबरतात पण मुख्यमंत्री हे मायबाप असतात. तसेच मी विरोधक जरी असलो तरी मी त्यांचा वयैक्तिक विरोधक नाही. मी वैचारिक विरोधक आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशी मला धमकी देणे योग्य नाही. मी कोणत्याही प्रकरणाला घाबरत नाही. पुढे बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये भिंगारदिवे नावाच्या व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला मारलं. नंतर पोलिसांनी हातवर केले. उघडपणे खून होत आहेत. अवैध धंदे सुरू आहेत.

Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार

पोलिस देखील याकडे दुर्लक्ष करतात. लग्न समारंभांना वेळेचं बंधन राहिलेलं नाही. त्यामुळे येऊरमध्ये निसर्गाचं चक्र यामुळे बिघडलं आहे. हे सगळे प्रश्न मी अधिवेशनात मांडाला असता. मला मुख्यमंत्र्यांनी माझ्या चौकशीची आठवण करून दिली.

Exit mobile version