Download App

MahaVikas Aghadi : …म्हणून उद्धव ठाकरेंना मोठी खुर्ची, अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

मागील काळात उद्धव ठाकरेंची पाठीशी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते सोफ्यावर बसत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे.

काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे सगळे नेते उपस्थित असताना देखील व्यासपीठावर इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. त्यामुळे इतर नेत्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांना अशी मोठी खुर्ची देणं सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?

मागील काळात उद्धव ठाकरेंची पाठीशी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ते पाठीमागे ताठ असलेली खुर्ची वापरतात. त्यामुळे त्याच्या शेजारी आणखी दोन सोफे आमच्यासाठी ठेवले होते. त्यामुळे मी जेव्हा व्यासपीठावर गेलो तेव्हा मी सगळ्याच्या खुर्च्या समान करायला सांगितल्या. असं स्पष्टीकरण त्यांनी यावर दिल. याच मुद्द्यावरून त्यांनी माध्यमांना नीट बातम्या देण्याबाबतही सुनावलं.

तेव्हा का सन्मान यात्रा काढल्या नाहीत

राज्यात शिवसेना आणि भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. त्यावर देखील त्यांनी टीका केली. ते म्हणाले की राज्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तवे केली. तेव्हा तुम्ही का सन्मान यात्रा काढल्या नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला.

लोकसभेपूर्वी पुन्हा राज्यात राजकीय भूकंप?; काँग्रेसचा बडा नेता देणार धक्का

देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले २०१४ साली त्यांची डिग्री बघून लोकांनी त्यांना निवडणून दिल का? त्यांनी देशात स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याआधी काश्मीर ते कन्याकुमारी असा करिष्मा भाजपचा नव्हता. त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच कौतुक केलं.

ते पुढे म्हणाले की आजवर आपल्या देशात अनेक नेते, मुख्यंमत्री झाले. ज्यांची शैक्षणिक पात्रता कमी होती. पण आपण बहुमताला किंमत देतो. ज्याचं बहुमत असतं, त्याला सत्ता मिळते. ते त्या पदावर बसतात. त्यामुळे ते प्रश्न महत्वाचे नाहीत. असं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us