लोकसभेपूर्वी पुन्हा राज्यात राजकीय भूकंप?; काँग्रेसचा बडा नेता देणार धक्का
Sanjay Sirsat On Ashok Chavhan : काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी करत राज्यातील मविआ सरकारला अडचणीत आणलं. त्यानंतर राज्यात जे काही घडलं ते सर्व देशाने पाहिले आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यात राजकीय भूंकप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा बडा नेता हा धक्का देऊ शकतो असे मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी व्यक्त केले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी हा धक्का काँग्रेसला (Congress) बसू शकतो असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. ते टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Rahul Gandhi : नेहरूंनीही इंग्रजांची माफी मागितली होती, केंद्रिय मंत्र्यांनी केला दावा
शिरसाट म्हणाले की, येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. तशा हालचालीदेखील सुरू आहेत. शिरसाटांनी यापूर्वी जी काही राजकीय भाकीत वर्तवली आहेत ती बऱ्यापैकी सत्यात उतरली आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांबाबत शिरसाटांनी व्यक्त केलेले भाकीत खरं ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का असेल असे बोलले जात आहे.
“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका
पटोले, थोरातांशी जमत नाही
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, अशोक चव्हाण यांचे पटोले, बाळासाहेब थोरातांशी जमत नाही. हे सर्वांना माहिती आहे. त्यात काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. त्यामुळे सध्या पक्षात जे काही सुरू आहे. त्यावरून आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील असे मला वाटते. यावेळी त्यांनी अंधारे हा विषय माझ्यासाठी संपला असल्याचे सांगत कालच्या छ. संभाजीनगर सभेत मविआची वज्रमूठ कुठे होती? असा खोचक सवालदेखील केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले केवळ उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी बसले होते.