Rahul Gandhi : नेहरूंनीही इंग्रजांची माफी मागितली होती, केंद्रिय मंत्र्यांनी केला दावा
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलेलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील इंग्रजांची माफी मागितली होती.’ असा दावा केला आहे.
त्याचबरोबर पुढे अनुराग ठाकूर असं देखील म्हणाले की, सावरकर होण्यासाठी तुरूंगात जावं लागत, त्याग करावा लागतो. असा टोला देखील त्यांनी यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला आहे. एका कार्याक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.
पुढे बोलताना ठाकूर म्हणाले, की सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना माफी मागण्यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला. ते ओबीसींची माफी मागू शकले असते. पंतप्रधान मोदींची माफी मागू शकले असते. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. अहंकार दाखवला. ज्यावेळी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हाच त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. त्यामध्ये लोकसभा काहीच करत नाही. हा आदेश येतो तेव्हा त्याला उत्तर द्यावे लागते. असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले.
Eknath Shinde : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीनगरमध्ये बसले
दरम्यान राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. यावरुन आघाडीत बिघाडी होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणात भाग घेत राहुल गांधींना सुनावल आहे. सावरकर यांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं म्हणत पवारांनी राहुल गांधी यांना सुनावल आहे.