Download App

अनिल परब यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

  • Written By: Last Updated:

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला. त्यानंतर आता ठाकरे गटासाठी देखील दिलासादायक बातमी आहे. मुश्रीफानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि आमदार अनिल परब (Anil Parab) यांना दिलासा दिला आहे. परब यांना दापोलतील साई रिसॉर्ट प्रकरणी 20 मार्च पर्यंत अंतरिम संरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

अनिल परबांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई उच्य न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीत कोर्टाने सांगितलं की सोमवारपर्यंत परब यांना अटक न करण्याचे आदेश ईडीला दिले आहेत.

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. या प्रकरणात याआधी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचंही नाव पुढं आलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. हे बांधकाम अनाधिकृत आहे, असा आरोप सोमय्यांनी केला होता. शिवाय, या बांधकामासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यात अनिल परब यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली होती.

Telegram App : टेलीग्रामचे युझर्ससाठी नवे फीचर्स, तुम्हीही वापरू शकता 

त्यानंतर साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदार कदम यांचे भाऊ सदानंद कदं यांच असल्याचा गौप्यस्फोट संजय कदम यांनी केला होता. त्यांनी मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केली होती. कमद यांना अटक केल्यानंतर ईडीने तक्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनाही ताब्यात घेतलं. या घडामोडीनंतर परब यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना तूर्तास दिलासा असून 20 मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण दिले.

 

Tags

follow us