Download App

‘गुजरातमध्ये लोकशाही नव्हे, हिटलरशाही’; पटोलेंची टीका

  • Written By: Last Updated:

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेवर सुरत येथील न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने अनेकजण निघाले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) ह्या देखील गुजरातला निघाला होत्या. मात्र, गुजरात पोलिसांनी त्यांनी अडवले असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आक्रमक झाले असून त्यांनी गुजरात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये लोकशाही नसुन हिटलरशाही असल्याचं त्यांनी सांगितलं.

नाना पटोले म्हणाले की, गुजरातमध्ये महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते येत आहेत. गुजरातच्या अनेक जिल्ह्यातून लोक हे राहुल गांधींच्या समर्थनार्थ सुरत इथं आहेत. मात्र, राहुल यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारा सामान्य माणसांसह महाराष्ट्रातून येणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. त्यांनी गुजरातच्या सीमेवर अडवल्या जात आहे.

पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेत आहेतत. आणि त्यांची चौकशी करत आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आता हुकुमशाही सुरू झाल्याचं चित्र आहे. इथं लोकशाही राहिली नसून हिटलरशाही असल्याचं दिसतं. त्यामुळं लोक भयभीत झाली आहेत. आम्ही याचा निषेध करतो, असं पटोले यांनी सांगितलं.

Sushma Andhare दाखल केला शिरसाट यांच्याविरोधात इतक्या रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा 

सुरतच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यासाठी ते गुजरातकडे रवाना झाले आहेत. राहुल यांच्या समर्थनार्थ देशभरातून कॉंग्रेस कार्यकर्ते गुजरातकडे निघाले आहेत. मात्र, कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अडवलं जातं असल्याचं पार्श्वभूमीवर पटोले बोलत होते. ते म्हणाले, माझ्यासह कॉंग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते हे राहुल गांधींसोबत कोर्टात जाणार आहोत.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांना देखील पोलिसांनी सीमेवर अडवलं. त्यामुळं ठाकूर यांनीही गुजरात सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या समर्थनार्थ गुजरातकडे जात असलेल्या कार्यकर्त्यांची अडवणूक होत आहे. मात्र, राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते. त्यावेळी त्यांची अशीच चौकशी केला होती का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

 

Tags

follow us