Download App

Ajit Pawar यांना शिंदे गटाच्या बंडाचा सुगावा कसा लागला?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड (Maharashtra Political Crisis) म्हणजे शिवसेनेमधील (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath shinde)आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड. या दिवशी नेमकं काय राजकारण झालं? 20 जूनला नेमकं काय झालं? त्या दिवशी नक्की काय घटना घडल्या याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी सविस्तर सांगितलंय. एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली त्यामध्ये पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सविस्तर सांगितलंय.

पवार म्हणाले, शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस आहे, याची कल्पना त्यांनी शिवसेना पक्षाला आधीच दिली होती, तेव्हा मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. त्यामुळं सरकार टीकवण्यासाठी सर्व गोष्टींवर मी लक्ष ठेवून असतो. सरकारला काही अडचण होणार नाही याची काळजी घ्यावीच लागते. शिवसेनेत नाराजी असल्याची कुणकुण माझ्या कानावर आली होती, त्यामुळं तशी कल्पना शिवसेनेला दिलीपण होती.

20 जूनचा दिवस विधानपरिषदेच्या मतदानाचा होता. मी माझ्या उपमुख्यमंत्री कार्यालयात बसलो होतो. तिथं अब्दुल सत्तार आणि काही सहकारी आमदार आले. त्यांच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. त्यावेळी आमचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमचे इतर सहकारी देखील उपस्थित होते. अब्दुल सत्तार निघून गेल्यानंतर मला काही आमदार म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांचा एक ग्रुप लॉबिमध्ये फिरतोय. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून ते स्वतः एकेक आमदाराला बोलावून त्यांच्याशी चर्चा करत
होते.

हे सगळं सुरु असतानाच त्या ग्रुपमधून एकेक आमदार कमी होत गेला. ठाण्याला निघायचं म्हणून आमदार गाडीत बसून जायला लागले. एकनाथ शिंदे त्यावेळी गटनेते होते. आमदारांचा एक ग्रुप गेला तेव्हा तो इतरांनीही पाहिला होता. हे बंड झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की ते एकत्र का जात होते, असंही पवार म्हणाले.

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलण्याचं का टाळतात? दिलं उत्तर

पवार म्हणाले की, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्यातील बहुतेक अधिकारी नेमले. त्यामुळं त्यांनीच नेमलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्या ठाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचा दावाही अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये केलाय.

follow us