Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलण्याचं का टाळतात? दिलं उत्तर

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलण्याचं का टाळतात? दिलं उत्तर

मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी गेल्या तीन वर्षात बोलणं टाळलंय. आपण बोलणं का टाळतो? आपल्याला त्याबद्दल का बोलायचं नाही याबद्दल अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत सांगितलंय.

पहाटेचा शपथविधी म्हटलं की, आपल्याला 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस आठवतो. तो दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणाचा इतिहास (Politics History)कधीही विसरुन चालणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. यादिवशी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपा (BJP)आणि शिवसेनेचा (Shivsena)वाद सुरू असतानाच ही घटना अचानक घडली होती. याला पहाटेचा शपथविधी असं देखील म्हटलं जातंय.

पहाटेच्या शपथविधीबद्दल अजित पवार म्हणाले की, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल बोलणं टाळतो, त्यावेळी ती गोष्ट त्याला टाळायचीच असते. हेच त्यामागचं कारण असतं. मी काही मूर्ख नाही की त्याबाबत आता भाष्य करेन. मी याविषयावर कधीच बोलणार नाही. मी पण पोहचलेला माणूस आहे. मला तो विषय काढायचा नाही. प्रसारमाध्यमं प्रश्न विचारू शकतात पण उत्तर द्यायचं की नाही हा माझा प्रश्न आहे, त्यामुळं मी या प्रश्नावर उत्तर देणारच नाही.

आम्ही राजकारणात आलो ते शरद पवार यांच्यामुळं. त्यामुळं ते ठरवतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा असते असंही यावेळी अजित पवार म्हणाले. वरिष्ठांचा निर्णय अंतिम असं ज्या ठिकाणी असतं तिथंच पक्षात शिस्त असते असं मला वाटतं.

त्याचवेळी पवार यांना मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असं विचारल्यावर म्हणाले की, फक्त मला वाटून काय उपयोग आहे? तेवढी क्षमता असेल तरच एखादा माणूस ते करू शकतो. जोपर्यंत माझ्याकडं 145 आमदार येतील असं वाटत नाही, तोपर्यंत मी उगीच स्वप्न बघणार नाही.

…त्यामुळं अजित पवारांना थोरातांच्या राजीनाम्याची माहिती आधीच मिळाली

उगाच स्वप्न बघायचं आणि पूर्ण होईल का वाट बघायची हे माझ्या स्वभावात बसतचं नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय. त्याचवेळी पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंकना 155 चं संख्याबळ मिळालं म्हणून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, नाहीतर ते होऊ शकले नसते असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube