…त्यामुळं अजित पवारांना थोरातांच्या राजीनाम्याची माहिती आधीच मिळाली
मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of group leader)दिल्याची माहिती विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना दिली होती. त्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना माहिती नव्हती, ती अजित पवार यांना आधी कशी काय समजली? याबाबत चर्चांना उधान आलं होतं, त्याबद्दलची अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे.
शिक्षक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवली, ते निवडून आले, पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नव्हती, पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना ही माहिती दिली होती. त्यामुळं पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना याबाबत माहिती नव्हती आणि पवारांना आधीच याची कल्पना कशी यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
यावेळी अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांचा वाढदिवस होता. मी वाढदिवसाला सर्वपक्षाच्या नेत्यांना फोन करुन शुभेच्छा देतो. मी माणुसकी आणि महाराष्ट्राची परंपरा म्हणून वाढदिवसाचा फोन केला होता. त्यावेळी बाळासाहेब यांनी मला सांगितलं की, मी राजीनामा दिला. एवढंच ते बोलले. त्यानंतर मी दुपारी फॉर्म भरायला गेलो. त्यांनी शुभेच्छा देताना राजीनाम्याचं सांगितलं. मला त्याबद्दल मला माहिती असेल अन् तुम्ही मला विचारलं तर मी ते सांगणारच ना, असंही पवार म्हणाले. त्याचवेळी बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचंही ते म्हणाले.
Satyjeet Tambe यांनी नाकारली अदृश्य शक्तीची मदत