Satyjeet Tambe यांनी नाकारली अदृश्य शक्तीची मदत

  • Written By: Published:
Satyjeet Tambe यांनी नाकारली अदृश्य शक्तीची मदत

मुंबईः नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी आज विधानभवनात आमदार म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर मात्र माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबे यांनी नगर जिल्ह्यातील एक अदृश्य शक्तीची मदत मात्र नाकारली आहे. ज्ञात-अज्ञात सर्वांची निवडणुकीत मदत झाल्याचे तांबे यांनी सांगितले आहे.

नगर जिल्ह्यातील राजकारणात मातब्बर असलेल्या विखे (Vikhe) कुटुंबियांकडे एक अदृश्य शक्ती म्हणून पाहिले जाते. या शक्तीचा आशीर्वाद असल्यास अनेकांना राजकारणात फायदा झाला आहे. नाशिक पदवीधरमधून अपक्ष म्हणून सत्यजीत तांबे हे रिंगणात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी राजकीय संघर्ष असताना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तांबेंसाठी अनुकूल भूमिका घेतली. भाजपने येथे उमेदवारही दिला नव्हता. तसेच खासदार सुजय विखे, डॉ. राजेंद्र विखे यांनीही तांबेंसाठी अनुकूल भूमिका घेतली होती. सत्यजीत तांबेंसाठी खास ट्वीट ही केले होते.

एकीकडे सत्यजीत तांबेंसाठी अनुकूल भूमिका असताना नगरचे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर मात्र राजकीय प्रहार सुरूच ठेवले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोरात यांना एक आठवण करून देत विखे यांनी त्यांना डिवचले आहे.

विखे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर थोरात यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखी एकट्याने खिंड लढवू, असे विधान केले होते. त्याची आठवण करून देत विखे यांनी थोरातांवर निशाणा साधला होता. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अदृश्य शक्तीचा नाही तर ज्ञात अज्ञात सर्वांनी निवडणुकीत मदत केल्याने विजयी झालो असल्याचे विधान केले आहे.

Satyjeet Tambe यांनी घेतली अनोखी शपथ; वडिलांचे कौतुक करणारे ट्वीट

एकप्रकारे सत्यजीत तांबे यांनी विखें यांची अदृश्य शक्ती नाकारली आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आलो असून, अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. माझ्या विजयासाठी मतदारसंघाच्या बाहेरीला तरुण मदतीसाठी आले होते. तेही प्रचारात अग्रेसर होते. मी महाराष्ट्रातील तरुणांचा आवाज म्हणून काम करणार आहे. मी तरुण, पदवीधर, शिक्षक यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करेल, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube