Mararashtra politics : पुढील वर्ष महाराष्ट्रासाठी निवडणुकीचे वर्ष असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी रंगणार आहे. एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 2024 मध्ये अनेक अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरवणार वर्ष असल्याचे बोलले जात आहे. आता अध्यात्मिक गुरू सद्गुरु श्री दयाल (डॉ. स्वामी आनंद) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी 2024 हे वर्ष कसे असेल याचे भाकीत केले आहे.
शरद पवारांसोबत पुन्हा विश्वासघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रत्येक चाल विरोधकांना अस्वस्थ करत असते. वेळेपूर्वी परिस्थितीचा अंदाज घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असे म्हटले जाते. म्हणूनच त्यांच्या गुगलीने प्रतिस्पर्ध्याची दांडी उडते. अध्यात्मिक गुरू सद्गुरु श्री दयाल यांचा अंदाज आहे की नवीन वर्षाच्या मार्चअखेरीस शरद पवारांची आपल्याच लोकांकडून फसवणूक होईल, परंतु त्यानंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढणार आहे. 16 मे पर्यंत ते कायम चर्चेत राहणार आहेत. त्यानंतर 13 जुलैपर्यंत त्यांना ताकद कमी झाल्यासारखे वाटेल. यानंतर 14 जुलै ते 3 सप्टेंबर दरम्यान त्यांची सरकारशी जवळीक वाढवेल.
ज्यांनी राम नाकारला त्यांचा पराभव झाला, रामजन्मभूमीच्या मुख्य पुजाऱ्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
एकनाथ शिंदेंना कटकारस्थानांचा सामना करावा लागणार
10 जानेवारीपर्यंत शिवसेनेतील बंडखोरीवर विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे शिंदे गटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार आपात्र होणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता अध्यात्मिक गुरू सद्गुरु श्री दयाल यांनी भाकीत केले आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विरोधकांना भारी पडतील. फेब्रुवारी आणि त्यानंतरच्या महिन्यांत त्यांना अनेक प्रतिकूल परिस्थिती आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल. शिंदे यांचा निडर स्वभावामुळे त्यांना त्रास होणार आहे. वर्षाच्या मध्यात एकनाथ शिंदे यांना राजकीय आणि मानसिक त्रास होईल.
राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!
त्यांना अनोळखी व्यक्तींसह त्यांच्या प्रियजनांकडून तणावाचा सामना करावा लागेल. त्यांच्या सरकारवर अनेक आरोप होतील आणि विरोधकांकडून हल्लाबोल होईल. या काळात सर्वसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढेल. 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांना कटकारस्थानांचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विचार करुन आपले मोहरे उतरावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीचे त्यांना संधीत रूपांतर करावे लागणार आहे.