मी सगळे काम केले पण कधीच नारळ फोडला नाही, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळीत कामाच्या भूमी पूजन कार्यक्रमात बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे टोला लगावला. त्याम्हणाल्या मी सगळे काम केले पण कधीच नारळ फोडायला आले नाही कधीच मी श्रेय घ्यायला आले नाही. परंतु हे कामाचे श्रेय घेण्यास सर्वात पुढे असतात. यावेळी त्यांनी केंद्रात व राज्यातील सरकारमुळे […]

Untitled Design (5)

पंकजा

परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळीत कामाच्या भूमी पूजन कार्यक्रमात बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे टोला लगावला. त्याम्हणाल्या मी सगळे काम केले पण कधीच नारळ फोडायला आले नाही कधीच मी श्रेय घ्यायला आले नाही. परंतु हे कामाचे श्रेय घेण्यास सर्वात पुढे असतात. यावेळी त्यांनी केंद्रात व राज्यातील सरकारमुळे परळीमध्ये किती कामे झाली, याची माहिती दिली.

केंद्रात आमचा सरकार राज्यात आमचं सरकार मग हे निधी कुठून आणतात आणि कसा आणतात,
राज्यात त्यांचं सरकार होत त्यावेळेस मी कधी म्हंटलं नाही कि हे काम मी केलं ते काम मी केलं. परंतु हे सगळीकडे श्रेय घेत सूडले आहेत असे देखील यावेळी पंकजा म्हणाल्या.

विरोधकांनी विकासाच्या नावाखाली फक्त परळीतील भुयारी गटारयोजनेच्या नावाखाली रस्ते फोडून ठेवले. तुम्हाला कसा विकास पाहिजे. जनतेला पिढी घडवणारा नेता पाहिजे, पिढी वाया घालवणार नेता नको आहे, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

Jayant Patil : शिंदे-फडणवीसांची घाबरगुंडी उडाली, निवडणूक घेण्याची हिंमत नाही 

आमच्या सरकारच्या योजनांचे भूमीपुजन व शुभारंभ करण्यासाठी पुढे येतात. तसेच पैसे वाटप करणारा, तमाशा दाखवणारा, मते विकत घेणारा, भ्रष्टाचार करणारा, खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहीन व्यक्ती ही राजकारणातील व्हिलन असते, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला.

Exit mobile version