Nana Patole : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सातत्याने राज्यात निवडणुकांच्या निमित्ताने भ्रमंती करतांना दिसत आहेत. कॉंग्रेसला राज्यात पुन्हा सत्ता मिळणून देण्यासाठी पटोले चांगलेच सक्रिय झालेत. दरम्यान, त्यांच्या याच गोष्टीचं कौतुक माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी केली. नाना पटोले फार सक्रिय आहेत. मी त्यांच्याइतका फिरलो नाही, ते फारच फिरतात.
काल सोलापुरमधील हुतात्मा स्मृतिमंदिरात कॉंग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात बोलतांना सुशीलकुमार शिंदे यांनी पटोले यांच्या कार्यशैलीचं कौतूक केलं. नाना हे कायम दौऱ्यावर असतात. सतत सक्रीय असतात. मी दोन वेळा काँग्रेसचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष होतो, मात्र नाना पटोले यांच्या इतका फिरलो नाही, असं सांगत पटोलेंची स्तुती केली.
या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, अस्लम शेख, भाई जगताप, मोहन जोशी, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.
Wrestlers Protest : ‘नार्को टेस्ट करायला तयार पण…,’ बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटुंना घातली अट
यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, भाजपा विरोधात मतदारांच्या मनात मोठी चीड आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला सपशेल नाकारलं. इंदिराजीं कर्नाटकातील चीकमंगळूर मधून निवडून आल्या आणि वार बदललं. तसं आता अनेक ठिकाणी भाजपला मतदार लोळवतील. त्यामुळे भाजप आता राज्यातच नाही तर गल्ली बोळात देखील दिसणार नाही, फक्त त्यासाठी आपल्याला ठाम भूमिका घेऊन काम करत राहावं लागेल, असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, प्रा. अशोक निंबर्गी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात केला. त्यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, एवढे दिवस भाजपामध्ये काम करणारे प्रा. निंबर्गी चाचरत प्रवेश करतील असं वाटत होत मात्र निर्भीडपणे त्यांनी प्रवेश केला.