‘मी स्टॅम्पवर लिहून देतो, शिवसेना सोडणार नाही’, खासदार अरविंद सावंतांनी सगळंच क्लिअर केलं…

मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, मी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, बैठकीचे फोटो असतील तर ते प्रकाशित करण्याचंही आवाहन अरविंद सावंत यांनी दिलंय.

Untitle (51)

Untitle (51)

Arvind Sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant ) यांच्यासह इतर खासदार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. या बातम्यांनंतर अखेर आज खासदार अरविंद सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, मी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, बैठकीचे फोटो असतील तर ते प्रकाशित करण्याचंही आवाहन अरविंद सावंत यांनी दिलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

होर्मुझ मार्गावरील तणावातही भारत सुरक्षित; ‘ग्रीन आशा’ जहाज सुरक्षित दाखल, देशातील LPG पुरवठा अखंड सुरू

पुढे बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, 24 तारखेला आमची कोर्टात पक्ष चिन्हावर सुनावणी आहे. सुनावणीआधी अशा बातम्या सोडल्या जात आहेत. मी कधीच मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, जगू आणि मरु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच. मला उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबत असेल. शिवसेनेशी प्रतारणी म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा, उद्धवजींच्या एका फोनवर मी मंत्रिपदही सोडलं. माझी कोणासोबत बैठक झाली असेल तर त्याचा फोटो छापा, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार सावंतांनी दिलंय.

तसेच मुंबई ठाण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये माझं नाव छापलं जातं. एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमांना असतात त्या शासकीय कार्यक्रमांनादेखील मी जात नाही. एकदाही मी कुठं गेलेलो नाही किंवा कोणाशीही कधीच संपर्क केलेला नाही. हवं तर माझे सीडीआर काढून तपासा, असंही खुलं चॅलेंज खासदार सावंत यांनी दिलंय.

ब्रेकिंग : बारामती निवडणुकीतून काँग्रेसची माघारीची घोषणा; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

दरम्यान, ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत दोघांनाही अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. मी काही झालं तरी शिंदे सोबत जाणार नाही, असं खासदार अरविंद सावंतांनी स्पष्ट केलंय.

Exit mobile version