ब्रेकिंग : बारामती निवडणुकीतून काँग्रेसची माघारीची घोषणा; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
Baramati By Election बारामतीची जागा एका अपघाताने रिक्त झाली. यात कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला असे पवार म्हणाले.
Sunetra Pawar to win Baramati bypolls as Congress pulls out of election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असूनकाँग्रेसने बारामती निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती, आता अखेर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आपला अर्ज परत घेणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. पार्थ पवार यांचे वक्तव्य अपरिपक्व वक्तव्य होतं, त्यामुळे बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते भूल जाना चाहिए असेही सपकाळ म्हणाले.
#Breaking: Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal announced that the party will withdraw its candidate from the Baramati Assembly by-election, where Congress leader Akash More was set to contest against Deputy CM Sunetra Pawar, following requests from the Chief… pic.twitter.com/xXJUdxOsfu
— IANS (@ians_india) April 9, 2026
सपकाळ काय म्हणाले?
अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक अत्यंत भावनिक असल्याने, काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा करू नये, अशी विनंती पवार कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने मित्रपक्षांच्या विनंतीला मान देत माघार घेण्याचे ठरवले आहे. आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत आम्ही कोणालाही पाठिंबा देत नसून आम्ही या निवडणुकीत नसणार आहे असे सपकाळ म्हणाले. अजित दादांच्या अपघात गुन्हा दाखल होत नाही. सरकार जरूर लपवत असल्याचे ते म्हणाले. मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगाने भावनेच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला सकारात्मक साद घेण्याच्या अनुषंगाने आमचा उमेदवार उभा राहणार नाही. बारामतीत काँग्रेस उमेदवार उमेदवार अर्ज मागे घेईल सभ्यतेच्या अनुषंगाने आम्ही दोन पावले मागे घ्यावे लागले असे म्हणत संस्कृती सभ्यता म्हणून निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे सपकाळ म्हणाले.
Baramati By Election : दोन पावलं मागे अन् मोठी झेप; बारामतीत काँग्रेसच्या माघारीमागची खरी स्क्रिप्ट
बारामतीचे मैदान गाजवायला तयार होतो
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात आम्ही आकाश मोरे यांच्या माध्यमातून बारामतीचे मैदान गाजवायला तयार होतो. आमचा प्रचारही जोरात सुरू झाला होता. मात्र, अजित पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे त्यांच्याशी जुने संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मित्रपक्षाचा शब्द आणि महाराष्ट्राची राजकीय परंपरा राखण्यासाठी आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे
काकी सुनेत्रा पवारांसाठी रोहित पवार मैदानात
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घ्यावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. यावेळी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला. भेटीवेळी अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती.
अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर आहे. पण तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती रोहित पवार यांनी केली होती.
काँग्रेसला शरद पवारांचा सल्ला
एकीकडे रोहित पवारांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत होती. तर, दुसरीकडे काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीत लढवण्यातबाबतच्या निर्णयावर शरद पवारांना विचारण्यात आले त्यावर बोलताना पवारां काँगेस राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त झाली. एका अपघाताने झाली. कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे, असं शरद पवारांनी म्हटले होते.
देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन
बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (harshwardhan sapkal) यांना फोन केला होता. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण ताकदीने पाठीशी असल्याचा शब्द सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला होता. त्यानंतर आज फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन फिरवून, उमेदवार मागे घेण्याची विनंती केली.