Download App

भाजपाला आमची गरज नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, महादेव जानकर स्पष्टच बोलले

मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे आगामी निवडणुकांसाठी शिंदे व फडणवीस सरकार तयारीत आहे तर महाविकास आघाडीकडून देखील तयारी सुरु आहे. एकीकडे जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत काहीसे बिनसले असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आता युतीला इशारा दिला आहे. भाजपला आमची गरज वाटत नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा यावेळी जानकर यांनी दिला आहे. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वीच शिंदे – फडणवीसांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसते आहे.

यावेळी बोलताना जानकर म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी भाजपाला (BJP) जर आम्हाला सोबत घेण्याची इच्छा नसेल तर आम्ही देखील त्यांच्या मागे पळणार नाही. आम्ही स्वतःच्या हिंमतीवर 48 जागा लढण्यास समर्थ असल्याचे म्हणतच एकप्रकारे जानकर यांनी भाजपला इशाराच दिला आहे.

तसेच पुढे बोलताना जानकर म्हणाले, मी नुकतेच पहिले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यामध्ये त्यांनी भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 248 जागा तर शिंदे गटाला 40 जागा देणार आहे. जर त्यांची इच्छाच नसेल आम्हाला सोबत घ्यायची तर आम्ही आमच्या ताकदीवर निवडणुका लढवू तसेच आगामी निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असे जानकर म्हणाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…महाराष्ट्र ‘SET 2023’ परीक्षेचे प्रवेश पत्र जारी

जागा वाटपावरील चर्चेवर जानकर म्हणाले…
येत्या काळात होणाऱ्या निवडणुका पाहता भाजप व शिंदे गटाने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी देखील आपणास हव्या असलेल्या जागांबाबत भाजपाला कळविले होते. आपल्याला लोकसभेसाठी पाच जागा मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच जिथे आमची औकात आहे तिथेच आम्ही लढणार आहे.

शेतकरी नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे देणार, जाणून घ्या संपर्क क्रमांक

मात्र त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नसेल व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे एकमेकांशी जुळत असेल तर आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहे. आम्ही आमच्या ताकदीवर सर्व ठिकाणी उमेदवार उभे करू. तसेच आम्ही जिंकण्याच्या तसेच काही ठिकाणी पराभव देखील स्वीकारू असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी केले आहे.

Tags

follow us