अमरावती : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी आले म्हणून त्यांची चौकशी बंद झालेली नाही. असे असेल तर त्यांनी त्याचे उदाहरण दाखवावे. कोणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो, ज्यांनी चूक केली आहे, त्यांची चौकशी होणारच आहे, असा इशारा फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना अमरावतीत दिला.
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे यंत्रणांचा गैरवापर करत असल्याच पत्र 9 राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच लिहिलेले आहे, यावर अमरावतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे.
न्याय मिळत नसेल तर न्यायालय आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी यंत्रणांचा असा गैरवापर झाला असल्यास ते उदाहरण दाखवावे असे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, विरोधी पक्षातून भाजपमध्ये आला तर त्यांची चौकशी बंद होते कुणाचीही चौकशी बंद झाली नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Latur News : लातुरात खळबळ.. काँग्रेस नेत्याच्या घरात भावाने संपविले जीवन; पोलीस घटनास्थळी
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांकडून होणाऱ्या कारवायांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करण्यात येत नाहीये. त्यामुळे असे कुठले पत्र घेऊन किंवा पत्र लिहून चौकशीच्या फेऱ्यांमधून कोणाची सुटका होणार नाही. यावरील उपाय एकच आहे आणि तो म्हणजे हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सर्व काही त्यांनी बंद केले पाहिजे.”