Latur News : लातुरात खळबळ.. काँग्रेस नेत्याच्या घरात भावाने संपविले जीवन; पोलीस घटनास्थळी
Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या भावकीतील चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81) यांनी आत्महत्या (Suicide) केली. त्यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून स्वतःवर गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली. या धक्कादायक घटनेमुळे लातुरात खळबळ उडाली असून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.
वाचा : Sanjay Raut यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, शंभूराज देसाई यांची घणाघाती टीका
चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलतभाऊ आहेत. लातूरमधील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर येथील निवासस्थानी चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पाटील यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता, अशी सुद्धा माहिती मिळत आहे. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते, असेही कळते.
आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी पंचनामा सुरू केला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी पोलीस तपासातून माहिती समोर येईल.
Shahajibapu Patil : संजय राऊत हे कुणाचे हस्तक ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती
दरम्यान, चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी आत्महत्या करण्याआधी स्वतःच्या मोबाइलमधील परिचितांना गुड बाय असा टेक्स्ट मेसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअॅपवर देखील त्यांनी गुड बाय स्टेटस ठेवल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारावरून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय आधीच घेतला होता का, अशीही चर्चा सुरू आहे.