Sanjay Raut यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, शंभूराज देसाई यांची घणाघाती टीका
मुंबई : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधीमंडळ हे तर चोर मंडळ आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असे राऊत म्हणाले होते.
यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) घणाघात टीका केली, म्हणाले पाठीमागचे ३ ते साडेतीन महिने संजय राऊत जे आराम करायला गेले होते, तिथून आल्यापासून संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची घणाघात टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केली आहे. आज बघा तुम्ही या सर्वोच्च विधिमंडळाला (Legislature) चोरमंडळ संबोधले आहेत, हा लोकशाहीचा घोर अवमान, या विधिमंडळाचा पवित्र सभागृहाचा एकप्रकारे घोर अपमान संजय राऊतांच्या घोर वक्तव्याने केला असल्याची टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
चोरमंडळ म्हणताच सत्ताधाऱ्यांचा संताप; राऊतांविरुद्ध हक्कभंगाची चाल
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, ठाण्याचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी तिथं पाठवलं पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सभागृहामधील जर आपण भावना जर पाहिले असतील तर अगदी आमच्या सारख्या मंत्र्यापासून ते सर्व आमदारांनी संजय राऊत यांच्या वक्त्यव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे, तिसरी वेळ आहे, आज सकाळपासून सभागृह बंद पडलेले आहे.
या पवित्र सभागृहामध्ये कायदे केले जातात, नियम केले जातात, नियम बाह्य वर्तवणूक करणाऱ्या कितीतरी वरिष्ठ अधिकारी या कुणी असला, तरी हक्कभंग समितीनी जर शिक्षा ठोठावली, तर विधानमंडळासमोर असलेल्या कटड्यामध्ये तो व्यक्ती किती जरी मोठा असला तरी शिक्षा सुनावली जाती. ही प्रतापरंपरा या विधिमंडळाची आहे. आमची तर सभागृहामध्ये मागणी आहे, विधिमंडळाची सर्व नियम जे आहेत, ते सर्व लागू करून, आज सभागृह संपायच्या आत संजय राऊत याना विधानसभेच्या कटड्यासमोर बोलावलं पाहिजे, आणि तातडीने त्यांना शिक्षा सुनावली पाहिजे, अशा पद्तीची मागणी त्यांनी यावेळी केली.