Shahajibapu Patil : संजय राऊत हे कुणाचे हस्तक ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T123728.463

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या घाणेरड्या बोलण्यामुळे त्यांची प्रतिमा जनसामान्यांमध्ये ढासळत चाललेली आहे, अशी टीका शहाजी बापूंनी त्यांच्यावर केली आहे. राऊत यांनी आज कोल्हापूर ( Kolhapoor ) येथे माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. हे 40 चोरांचे चोरमंडळ असल्याचे राऊत म्हणाले आहेत. यावरुन त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होते आहे.

संजय राऊतांच्या या वक्तव्याचा शहाजी बापूंनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊतांना एक दिवस त्यांच्या जीवनात सगळ्या वाक्यांचा पश्चाताप होणार आहे. त्यांच्या भडक बोलण्याने महारष्ट्रात त्यांना प्रसिद्धी मिळेल या गैरसमजात ते आहेत. महाराष्ट्र हे बुद्धीमंतांचे  राज्य आहे. संजय राऊतांच्या दिवसेंदिवस घाणेरड्या बोलण्यामुळे त्यांचीच प्रतिमा महाराष्ट्रात खालावत चालली आहे, अशा शब्दात शहाजी बापूंनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

(चोरमंडळ म्हणताच सत्ताधाऱ्यांचा संताप; राऊतांविरुद्ध हक्कभंगाची चाल)

तसेच संजय राऊतांसारखी माणसे जवळ असणे हे भविष्यात उद्धव साहेबांसाठी घातक ठरणारे आहे. त्यामुळे आता तरी अशी माणसे तातडीने बाजूला करावी, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राऊत यांनी उद्धव साहेब व मातोश्रीचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतली आहे. राऊत हे कुणाचे हस्तक आहेत हे सगळ्यांना माहित आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली.

दरम्यान संजय राऊत यांनी आज बोलताना विधीमंडळाला चोरमंडळ असे म्हटले आहे. यावरुन विधानसभेत देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे.

 

Tags

follow us