Download App

Mahesh Tapase : शरद पवारांचा राजीनामा कमिटीने मंजुर केला तर आम्ही आमचा राजीनामा देऊ

If the committee approves Sharad Pawar’s resignation, we will tender our resignation : काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पवारांच्या घोषणेनंतर काल सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले होते. कार्यकर्त्यांना आंदोलनही केलं. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. दरम्यान, आता जर शरद पवार यांचा राजीनामा कमिटीने मंजुर केला तर आम्ही देखील आमचा राजीनामा देऊ, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी सांगितलं.

पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचं सांगितलं. यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना चांगलाच वेग आला आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे दिले. तर पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी साद कार्यकर्ते घालत आहेत. दरम्यान, शरद पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. पवारांनी पायउतार होण्याची घोषणा घेतल्यानंतर यावर निर्णय घेण्यासाठी NCP ने समिती स्थापन केली आहे.

याविषयी बोलतांना महेश तपासे यांनी बोलतांना सांगितलं की, आता, जर शरद पवार यांचा राजीनामा कमिटीने मंजुर केला तर आम्ही देखील आमचा राजीनामा देऊ. पवार साहेब हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचा राजीनामा आम्हाला मान्य नाही. आज लाखो लोक मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. आणि राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. लोटांगन घालू, असं तपासे यांनी सांगितलं.

पवारांच्या निर्णयाची राऊतांना आधीच कुणकुण; म्हणाले, त्यांच्या मनातली अस्वस्थता..

शरद पवार हे आमचा आत्मा आहेत. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नाही. शरत पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा. जर कमिटीने पवारांचा राजीनामा मंजूर केला तर आम्ही सगळे राजीनामा देऊ. ते आमचे दिशादर्शक आहेत. त्यांची आम्हाला गरज असल्यचां तपासे यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते पवार?
NCP च्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी घोषणा पवारांनी केली होती. 1 मे 1660 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुठंतरी थांबायचा सुध्दा विचार केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता वाटेल, पण मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे.

दरम्यान, आता नेते-कार्यकर्ते करत असलेली मनधरणी पाहून शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us