Download App

मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे

मराठ्यांनी जातीवाद केला असता तर गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे इतक्या मोठ्या पदावर गेले असते? असं जरांगे पाटील म्हणाले

Image Credit: letsupp

Manoj Jarange Patil : महाराष्ट्रातील भाजपचे चार-दोन नेते आहेत ते मराठा समाजाचा मोठा द्वेष करतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कान फुंकले असं म्हणत मनोज जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. (Manoj Jarange) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातच मुक्काम ठोकावा लागतोय हे मराठा समाज एकत्र झाल्याची ताकद आहे असा दावाही जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

 

मराठा समाज हुशार झालाय

आज कुणाला निवडून आणण्यात नाही तर त्यांना पाडण्यात मोठा विजय आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्ष आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा संदेश दिला. तसंच, पाडा पण नक्की कुणाला पाडा असं विचारलं असता जरांगे पाटील म्हणाले, आज मराठा समाज खूप हुशार झालाय. त्यामुळे त्यांनी इतकं खोलात जाऊन सांगायची गरज नाही असं म्हणत जरांगे यांनी या विषयाव जास्त बोलणं टाळलं.

 

कोण जातीवादी आहेत

मराठे जातीवादी असते तर गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रितम मुंडे राजकारणात असत्या का? असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी मराठेइतर नेत्यांचा पाढाच वाचला. सुशिल कुमार शिंदे यांच्यापासून ए.आर अंतुले यांच्यापर्यंतचा इतिहास सांगून जरांगे यावेळी म्हणाले हे नेते मराठ्यांनी साथ दिली नसती तर इथपर्यंत पोहचले असते का? असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी अनेक उलटं प्रश्न उपस्थि केले.

 

एसआयटी स्थापन करण्याइतक काय केलं?

आज अनेक डाव टाकून झाले आहेत. परंतु, त्यांना मला खरेदी करता येत नाही. आता त्यांनी मला भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सर्वच लोकांना आपल्या मुलांची काळजी असते. त्यामुळे माझ्या कुटुंबातील व्यक्तिवर किंवा माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत जरांगे यांनी थेट फडणवीसांवर गंभीर आरो केले. तसंच, एसआयटी स्थापन करण्याइतक मी काय केलं? होतं असा प्रश्नही जरांगे यांनी यावेळी उपस्थित केले.

follow us

वेब स्टोरीज