विलास घुले प्रकरण, परळीवाल्यांचे ऐकून खोटे आरोप करु नका; जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Manoj Jarange On Vilas Ghule Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय

Manoj Jarange On Vilas Ghule Case

Manoj Jarange On Vilas Ghule Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत एसआयटीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्लाबोल केला आहे. घुले कुटुंबियांनी परळीवाल्यांचे ऐकून कोणावरही खोटे आरोप करु नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, घुले कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. यापूर्वी महादेव मुंडे प्रकरणात देखील एसआयटी स्थापन करण्यात आली होती मात्र तिथे केवळ थातूरमातूर तपास झाला. घुले हत्या प्रकरणात एसआयटीला (SIT)  एकतर्फी काम करता येणार नाही. जर या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांचा मुलगा दोषी असेल तर सत्य काय आहे ते समोर येईलच. कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

तर दुसरीकडे या प्रकरणात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही परळीवाल्यांसारखे आरोपी लपवत नाही. त्यांनी खून करुनही तो केला नाही असं म्हटलं. पण तशी नियत आमची नाही. आम्ही मराठे कधीही असं वागत नाही. घुले कुटुंबाला जर आमची मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण परळीवाल्यांचे ऐकून तुम्ही कोणावरही खोटे आरोप करु नका असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

नाशिक – संगमनेर रेल्वेसाठी आमदार खताळांना मी पहिला फोन केला… सत्यजित तांबेंचा दावा-

विलास घुले प्रकरणात धक्कादायक दावा

विलास घुले हत्या प्रकरणात उमेश माने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता उमेश माने यांच्यावर एका महिलेने आरोप केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. उमेश मानेने आपले आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवले नाही तर नवरा आणि मुलांना मारून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने उमेश मानेंवर केला आहे.

follow us