Gulabrao Patil : आम्ही मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आलो, नाही तर…; गुलाबराव भाजपवर भडकले

Gulabarao Patil on BJP :  जळगाव येथे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर वाद असल्याचे दिसून आले आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये भाजपला खडे बोल सुनावले आहेत. आम्ही फक्त मोदींचे नेतृत्व मान्य करुन तुमच्या बरोबर आलेले आहोत, असे ते म्हणाले आहेत. आपल्याकडून […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 01T174903.766

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 01T174903.766

Gulabarao Patil on BJP :  जळगाव येथे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर वाद असल्याचे दिसून आले आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये भाजपला खडे बोल सुनावले आहेत. आम्ही फक्त मोदींचे नेतृत्व मान्य करुन तुमच्या बरोबर आलेले आहोत, असे ते म्हणाले आहेत.

आपल्याकडून एकही चुकीचा शब्द जाता कामा नये. त्यांना काहीही बोलू द्या पण आपल्याकडून काहीही चुकीचा शब्द जाता कामा नये. आपण सरळ शिंदे साहेबांचे आहोत. आपण मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवून यांच्यासोबत आले आहोत, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Donald Trump : पॉर्नस्टार, पैसा आणि डोनाल्ड ट्रम्प; डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? काय आहे प्रकरण

त्यांना काय बोलायचे ते त्यांना बोलू द्या. आपण मोदीजींचे नेतृत्व मान्य करुन आलेले आहोत. आपण निश्चितपणे एक लाईन पकडून आलेले आहोत. जर छोट्या-मोठ्या निवडणुकीसाठी हे राष्ट्रवादी सोबत युती करत असतील तर ते मोदी साहेबांना पण फसवत आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.

Kalicharan Maharaj : ‘गोडसे जेवढे वाचाल, तेवढे त्यांचे भक्त व्हाल; त्यांनी गांधींबाबत जे केलं ते योग्यच’

यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते  व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.  शिंदे गट हा आता उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून आमच्यासोबत आला आहे. त्यामुळे आगामी काळातील मार्केट कमिटी, नगरपालिका, महापालिका या सर्व निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत, असे महाजन म्हणाले आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये देखील आम्ही सोबत निवडणुका लढवणार आहोत, असे महाजनांनी सांगितले आहे.

Exit mobile version