मोठी बातमी: विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर

Maharashtra Legislative Council Election महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Maharashtra Legislative Council Election 2026

Maharashtra Legislative Council Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

‘त्या’ 15 मिनिटांत काय घडलं? CCTV फुटेजने समोर आणलं साहिल वाकोडे प्रकरणाचं सत्य

या निवडणुकीत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर हे पदवीधर मतदारसंघ आहेत, तर पुणे आणि अमरावती हे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या पाचही मतदारसंघांसाठी नव्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबरला जारी होईल. उमेदवारांना 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल, तर 9 ऑक्टोबर ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर 23 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीच्या तयारीला वेग येणार

निवडणुकीची तारीख स्पष्ट झाल्याने आता इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी, पक्षांतर्गत चर्चा आणि मतदारांशी संपर्क यांना वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये स्थानिक प्रश्न, शैक्षणिक मुद्दे आणि संबंधित मतदारांच्या अपेक्षा हे प्रचारातील महत्त्वाचे विषय ठरू शकतात.

महाराष्ट्र समान नागरी कायदा समितीला धक्का! ‘या’ कारणामुळे निवृत्त न्यायमूर्ती आर सी चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा

दरम्यान, 23 ऑक्टोबरच्या मतदानानंतर अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने या पाचही मतदारसंघांच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

follow us