Download App

Jalna Maratha Protest : ‘माझी चूक झाली आता तुम्ही वटहुकूम काढा’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना कोंडीत पकडलं

Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणासंदर्भात माझी वटहुकूम काढण्याची माझी चूक झाली आता तुम्ही वटहुकूम काढून दाखवा, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना चांगलचं कोंडीत पकडलं आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर तुम्ही का वटहुकूम काढला नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर प्रतिसवाल करीत उद्धव ठाकरेंनी कोंडीत पकडलं आहे.

“कोणी मागणी केली रे” : काटेवाडीच्या सरपंचांना फोन करत अजितदादांचा दरडावून सवाल

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान तोकडं आहे, वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे, तसं असतं तर मग दिल्ली सरकारने वटहुकूम फिरवला का नाही? दिल्ली विधेयकाबाबत केंद्र सरकारने वटहुकूम फिरवला, तो अधिकार केंद्र सरकारचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

चांद्रयान-3 मोहिमेच्या काउंटडाउनचा आवाज थांबला, इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

तसेच फडणवीसांचं तोकडं ज्ञान पाहुन ते आता मंत्रालयाच्या आजूबाजुलाही फिरण्याच्या कुवतीचे नसून देवेंद्र फडणवीस यांनी कधीही अभ्यास केला नाही, आता ते म्हणतात ना की आरक्षण रद्द झाल्यानंतर मी वटहुकूम काढला नाही, ठीक आहे माझी चूक झाली आता तुम्ही वटहुकूम काढून दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला फडणवीस-पवार का नाही आले? सीएम शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण…

लाठीचार्जचा आदेश आम्ही दिला नाही असं सरकारकडून सांगण्यात आलंय, याचा अर्थ राज्य सरकारचा गृह खात्यावर कंट्रोल नाही, त्यांचा प्रशासनावर काहीच वचक राहिलेला नाही, मी मुख्यमंत्री असताना कुठेही लाठीमार झाला नाही बारसू प्रकरणी तुम्ही माफी मागितली का? तुमच्या अंगलट आल्याने तुम्ही माफी मागत असल्याचीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठेही पेटवा-पेटवीची गोष्ट घडली नव्हती. आंदोलनस्थळी अचानक पोलिस आले आणि जरांगेंना उपचारासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, अशातच एका अधिकाऱ्याला फोन येताच लाठीमार सुरु झाला. हा कुठला प्रकार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.

Tags

follow us