फुलेंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसले, जयंत पाटलांचे भुजबळांवर टीकास्त्र…

महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसलेत, उभ्या महाराष्ट्राला काय उत्तर देणार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या बैठ जयंत पाटील बोलत होते. वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल यावेळी बोलताना पाटील म्हणाले, दोन […]

Jayant Patil

Jayant Patil

महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसलेत, उभ्या महाराष्ट्राला काय उत्तर देणार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या बैठ जयंत पाटील बोलत होते.

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, दोन वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर शरद पवारांनी छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी ठेवली. ज्यावेळी फुले पगडी तुमच्या डोक्यावर ठेवली तेव्हा बडवे आडवे नाही आले. पण ज्यांनी सावित्री फुले आणि महात्मा फुलेंची चेष्टा केली आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात आता उभ्या महाराष्ट्राला काय उत्तर देणार? असा सवालही पाटील यांनी केला आहे.

तासगावचा पुढचा आमदार ठरला! आर.आर. पाटलांच्या लेकानं गाजवलं शरद पवारांचं व्यासपीठ

तसेच 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा शिवतीर्थावर जेव्हा उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळासाठी दोन नावे विचारली तेव्हा शरद पवारांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं सांगितलं असल्याचंही जयंत पाटील म्हणाले होते.

NCP : अमोल कोल्हेंचे 24 तासांत घुमजाव; पवारांना भेटले पण राजीनामा न देताच माघारी फिरले

मागील अनेक वर्षांपासून शरद पवारांनी अनेक संकटांना तोंड दिलंय. पवारांनी कित्येकदा बाजी पलटवण्याचं काम केलं. मुंबई प्रदेशच्या निवडणुका जयंत पाटील करीत नाहीत. मी पक्षाच्या संघनटेच्या 6 तारखेच्या बैठकीनंतर सुट्टीवर जाणार होतो. पाच वर्षे प्रदेशाध्यक्ष राहिलो ,जिथं राष्ट्रवादीनाही तिथं कार्यकर्त्यांना भेटलो, मुंबईत बसून या गोष्टी केल्या असत्या पण नाही केल्या, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आज आमच्यासोबत अनेक लोकं होते, अनेकांना मोठ्या संध्या दिल्या आम्ही दिल्या होत्या.

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंपच झाला आहे. अजित पवारांच्या या कृतीला समर्थन न देता सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटत शरद पवार मैदानात उतरले आहेत. फुटीनंतर दोन्ही गटांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटाकडून प्रदेश कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठका मुंबईत झाल्या. या बैठकीतून अजित पवार गटासह शरद पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, टीकांचे सत्र सुरु होते.

Exit mobile version